आमदार म्हणून बिनविरोध निवडीचे प्रमाणपत्र प्रमोद जठार यांनी स्वीकारले

आता पुन्हा सहा वर्ष कोकणच्या विकासासाठी प्रयत्न करणार

भाजपाचे विधान परिषदेचे आमदार म्हणून प्रमोद जठार हे आज अधिकृतरित्या बिनविरोध निवडून आले असून, त्यांनी आज आपल्या निवडीचे प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते मुंबई येथे स्वीकारले. प्रमोद जठार यांनी या निवडीबद्दल भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह दिल्लीतल्या भाजपा नेत्यांचे आभार मानले असून पुन्हा कोकणच्या विकासासाठी सहा वर्ष काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!