कणकवली शहरातील सर्वच घरांना एकाच दराने कर आकारणी केली जाणार!

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडून या निर्णयाबाबत फेरविचाराची सूचना
नगरपंचायत कडून देण्यात येणाऱ्या दाखल्यांचे दर दुप्पट, तिपटीने वाढविण्याचा विचार
कणकवली शहरात सिग्नल यंत्रणा, जिल्हा परिषदेच्या शाळा नगरपंचायत कडे हस्तांतरण याच्यासह महत्त्वाचे ठराव मंजूर
सर्वांना समानकर आकारणी केली नाही तर आमच्यावर कारवाईचा बडगा मुख्याधिकाऱ्यांची भूमिका!
कणकवली शहरातील हायवेच्या आर ओ डब्ल्यू हद्दीतील बांधकामे हटवून ही जागा महामार्ग प्राधिकरण कडून नगरपंचायत च्या ताब्यात घेणे, कणकवली शहरातील जिल्हा परिषद शाळा नगरपंचायत कडे शाळेच्या जमिनीसह हस्तांतरित करणे, तसेच कणकवली नगरपंचायत मार्फत देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांचे दर दुपटीने किंवा काही ठिकाणी तिप्पट दराने वाढविणे या मुद्द्यांवरून आजची नगरपंचायत ची सभा लक्षवेधी ठरली नगराध्यक्ष संदेश परकरे यांनी दरवाढीच्या मुद्द्यावर जनतेवर जास्त बोजा टाकू नका अशी भूमिका घेतली कणकवली शहरातील सर्वच मालमत्ता धारकांना एकच कर आकारणीचा दर ठेवण्याबाबत मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी सूचना मांडली मात्र त्याला नगराध्यक्ष संदेश परकर यांनी आक्षेप घेतला पुढच्या बैठकीत हा विषय अजेंड्यावर ठेवून चर्चा करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला.
कणकवली नगरपंचायत ची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक व मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली. या बैठकीला नगरसेवक लुकेश कांबळे जयेश धुमाळे संकेत नाईक सुमेधा अंधारी जाई मुरकर रुपेश नार्वेकर दीपिका जाधव बंडू हर्णे राकेश राणे संजय कामतेकर स्वप्निल राणे आर्या राणे मेघा सावंत प्रतीक्षा सावंत आधी उपस्थित होते. मागील बैठकीच्या इतिवृत्त वाचनाच्या मुद्द्यावरून नगरसेवक बंद करणे यांनी आक्षेप घेतला. इतिवृत्त संकेतस्थळावर अपलोड केला का? असा सवाल करणे यांनी उपस्थित करताच इतिवृत्त या सभेत अंतिम झाल्यानंतर ते अपलोड करणार असे मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी सांगितले. त्यावर हर्णे यांनी नियम काय आहे? किती दिवसात इतिवृत्त अपलोड करावा लागते? असा सवाल करताच सात दिवसात अपलोड करावे लागतो अशी माहिती नगरपंचायत चे प्रशासकीय अधिकारी अमोल अगम यांनी दिली. मग एवढे दिवस का लागले त्याची कारणं द्या? असा सवाल हर्णे यांनी केला. सर्वच बाजू मी सांभाळू शकत नाही. कर्मचारी एक काम करतात. यापूर्वीच्या सभांचे इतिवृत्त अपलोड केलेले दिसले नाही. या सभेने नियम ठरवून द्यावेत असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर बंडू हर्णे यांनी हे नियम सभेचे नाहीत महाराष्ट्र शासनाचे आहेत. सभेचे कामकाज हे नियमाप्रमाणे काम चालते. त्यावर सभेने मला कामकाजाबाबत ठरवून द्या त्याप्रमाणे पुढच्या सभेपासून नियमाप्रमाणे काम चालवले जाईल असे गौरी पाटील यांनी सांगितले. ही चर्चा सुरू असतानाच नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी यापूर्वी इतिवृत्त नगरसेवकांना पाठवले जात नव्हते. त्यावर हर्णे यांनी नगरपंचायत कलम ८१ नुसार नगरपंचायत बैठकीच्या इतिवृत्त बाबत तरतूद आहे. त्यामुळे त्या नियमात काम झाले नाही तर संबंधित कर्मचारी अगम यांना नोटीस बजावा अशी मागणी हर्णे यांनी केली. कणकवली नगरपंचायत ला अधिकचे कर्मचारी आवश्यक आहेत. त्याची संख्या कमी आहे. त्याकरिता आकृतीबंधानुसार कर्मचारी भरती गरजेचे आहे. 2007 मध्ये आपण आकृतीबंध तयार केलेला होता. आजच्या स्थितीचे नगरपंचायत चे काम लक्षात घेऊन कर्मचारी वर्गाची गरज आहे. नगरपंचायत चे काम सक्षमपणे चालले पाहिजे. असा मुद्दा नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी मांडला. त्यावर मुख्याधिकारी यांनी कणकवली नगरपंचायत चा रोस्टर सर्वप्रथम करण्यात आला आहे. व बिंदूनामावलीनुसार अधिकची पदे भरण्यासाठी आपण यापूर्वीच्या रिक्त पदांचा प्रस्ताव देखील केला आहे. आता नवीन पदे वाढवण्यासाठी आपण मागणी करत आहोत असे गौरी पाटील यांनी सांगितले.
कणकवली शहराचे सर्वेक्षण करणे या ठरावावर चर्चा करत असताना शहराचे नागरिकरण वाढत आहे. रेल्वे व महामार्ग, व्यापाराची वाढती गर्दी शहराचा व्याप वाढला. शहराची सुरक्षा व कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी रोड मॅप आपल्याजवळ असला पाहिजे. म्हणून हे सर्वेक्षण करायचं आहे. अनेक नवीन बांधकाम झाली . व बांधकामात बदल झाले. अनेक दुकाने वाढली. हे डॉक्युमेंट तयार करण्यासाठी हे सर्वेक्षण गरजेचे आहे असे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितले. सर्वेक्षण साठी एजन्सी नेमायची आहे कणकवली शहरात किती हॉटेल धार्मिक स्थळ किंवा अन्य बाबी आहेत याची एक डॉक्युमेंट आपल्याला करायचा आहे. जी एजन्सी निघणार ती आपल्याला डाटा देणार आहे. यामध्ये सार्वजनिक मालमत्तांची देखील डॉक्युमेंटेशन केले जाणार आहे. याची लवकर निविदा काढा. अशा सूचना संदेश वारकरी यांनी दिल्या. परवानगी दिलेली बांधकामे व परवानगी न दिलेले बांधकामे व परवानगी दिल्यावर वाढलेली बांधकामे ही या सर्व मध्ये येणार आहेत का? असा सवाल बंडू हर्णे यांनी केला. त्यावर मुख्याधिकाऱ्यांनी ती देखील बांधकामे या सर्व मध्ये घेतली जातील असे सांगितले. कणकवली शहरातील जिल्हा परिषदेचे शाळा जमिनी सह नगरपंचायत कडे वर्ग करणे हा ठराव या बैठकीत घेण्यात आला. त्याबाबत माहिती देताना मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी सांगितले हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ही योजना असून एक कोटीचा निधी कणकवली नगरपंचायत ला येणार आहे. त्यामुळे आपल्या मालकीच्या शाळा नसतील तर हा निधी अखर्चित राहणार आहे. शहरातील मुले या शाळेमध्ये शिकतात. त्यांच्या दृष्टीने हे काम केले पाहिजे असे नगराध्यक्ष श्री पारकर यांनी सांगितले. यावर नगरसेवक हर्णे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा ताब्यात घेणे म्हणजे नाली साठी घोडा विकत घेण्याचा प्रकार आहे. शाळेतील शिक्षकांसहित आपल्याला पगार नगरपंचायतला द्यावा लागणार. नगरपंचायत ची एवढी आर्थिक क्षमता आहे का? हे सुद्धा तपासून पहा. आपल्याला आस्थापना हस्तांतरित करायची नाही. फक्त शाळा जमीन व इमारती हस्तांतरित होतात. अशी भूमिका पारकर यांनी मांडली. त्यावर उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी शहरातली कोणतीही एक शाळा घ्या व दिल्लीच्या धरतीधर्तीवर ही शाळा डेव्हलप करा. भविष्याच्या दृष्टीने असे काम नगरपंचायत कडून झाले पाहिजे. चांगल्या सुविधा व चांगल्या इमारती शाळेत चांगले वातावरण राहण्यासाठी नगरपंचायत म्हणून आपण हे काम केले पाहिजे. चांगल्या वातावरणासाठी आपण शिक्षणच बदलून टाकणार आहोत का? असा सवाल बंडू हर्णे यांनी केला. कणकवली शहरातील हायवे आर ओ डब्ल्यू लाईन मधील जागा नगरपंचायतीच्या ताब्यात देणे या मुद्द्यावर चर्चा करून ठराव घेण्यात आला. अनेक बांधकामांना नोटीसा दिल्या मात्र मोबदला घेऊन सुद्धा अनेक बांधकामे पाडली जात नाहीत. 1. 800 मीटर हायवे कणकवली शहरातून जात आहे. जमीन मालक, घरमालकांना पैसे मिळाले मात्र ही सर्व बांधकामे काढून ह्या जागा हायवेने आपल्या ताब्यात घ्याव्यात. अन्यथा नगरपंचायत ताब्यात द्यावी. नगरपंचायतला दिल्यास आपल्याला भविष्यात अनेक उपाययोजना करता येतील. नगरपंचायत जवळ अरुण च्या हद्दीतील जागा आल्यास सुशोभीकरण देखील करता येईल. यावर नगरपंचायत च्या बांधकाम अधिकारी यांनी काही इमारत मालकांना नोटिसा दिल्या धोकादायक इमारती या पाठविण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया म्हणून नोटीस दिल्या. तरी देखील बांधकामे काढली जात नाही. नगरपंचायत जवळ ही जागा हस्तांतरित केल्यास नगरपंचायत ही बांधकामे हटवू शकेल. यापूर्वी या नोटीसा दिलेल्या आर ओ डब्ल्यू किंवा अन्य जागांमधील मधील बांधकाम काढली नाहीत मग पुढे काय कारवाई करणार असा सवाल संजय कामतेकर यांनी केला. जिल्हा परिषद चे शिक्षक मुख्यालयी राहत असल्याबाबतचा ठराव या सभेत मांडण्यात आला. मात्र नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी हे शिक्षक खरोखरच मुख्यालयात राहतात का? याची खातरजमा करा अशी सूचना केली. तर नगरसेवक बंडू हर्णे यांनी हा धोरणात्मक निर्णय आहे. हा सभेमध्ये विषय कसा घेतला? असा प्रश्न केला. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सभेचा ठराव हवा अशी आमच्याकडे मागणी केली असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. या दाखल्याच्या आधारे घर भाडे घेतले जाते त्यामुळे अशा प्रकारे दाखला देताना खात्री करा अशी सूचना करण्यात आली. कणकवली शहरातील गॅस पाईपलाईन बाबत खुदाई करणे तसेच कणकवली शहरात 17 किलोमीटर अंतरामध्ये गॅस पाईपलाईन टाकणार असल्याबाबत चर्चा करण्यात आली. त्याकरता कंपनीने नॅशनल गॅस लिमिटेड ने परवानगी मागितली आहे. 2025 मध्ये आपल्याकडे हे पत्र दिलं. मात्र त्यानंतर आजपर्यंत आपल्याकडे कंपनीचे संबंधित अधिकारी फॉलोअप घेण्यासाठी आलेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडूनच या कामाला विलंब झालेला आहे असे मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी सांगितले. त्यावर नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी लोक सिलेंडर साठी आता फिरत आहेत. त्यामुळे आपण यांना संपर्क करून शहराच्या सोयीच्या दृष्टीने गॅस पाईपलाईन शहरात करण्यासाठी प्रयत्न करू. त्यावर बंडू हर्णे यांनी मिश्किल टोला लगावताना शहरात गॅस कमी पडेल असं वाटत नाही कारण नाईक व धुमाळे यांची गॅस एजन्सी आहे. ते कणकवली शहराला गॅस कमी पडू देणार नाही. ही गॅस पाईप लाईन खोदाई साठी जी अनामत रक्कम भरायची आहे व नियमांची पूर्तता केल्याशिवाय खोदायी करता येणार नाही. असे सूचना मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केली. ही कंपनी संपूर्ण महाराष्ट्रात काम करते. त्यामुळे करार केल्याशिवाय कंपनीला काम करायला द्यायचं नाही. यावर बोलताना हर्णे यांनी आम्ही सत्तेत असताना ही कंपनी आली त्यावेळी रस्तेखोदाई करण्याच्या मुद्द्यावरून त्याला विचारलं रस्ता रुंदीकरण करताना पुन्हा रस्त्याची डांबरीकरण करून त्याचा खर्च करायला ते तयार नाहीत . व शहरवासीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच कोणतीही नियोजन नाही.यामुळे ही पाईपलाईन करताना शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्राधान्य द्या नागरिकांची सुरक्षा धोक्यात घालून गॅस पाईपलाईन करण्यासाठी आग्रह नको असे हर्णे यांनी सांगितले. कणकवली शहरात सिग्नल यंत्रणा बसवणे याबाबत चर्चा करताना पटवर्धन चौक शिवाजी चौक तसेच अन्य आवश्यक असेल अशा ठिकाणी हे सिग्नल बसविण्यात येणार असल्याचे पारकर यांनी सांगितले. त्यावर हर्णे यांनी सिग्नल बसवण्यापेक्षा ट्राफिक कर्मचारी नेमा. हायवे ला सिग्नल बसवता येणार नाही असे मत मांडताच पारकर यांनी याबाबत संबंधित विभागाला पत्रव्यवहार करण्याच्या सूचना दिल्या. नगरपंचायत मार्फत देण्यात येणाऱ्या दाखल्यांचे दर वाढविण्याबाबत विषयावर जोरदार चर्चा झाली. बहुतांशी दाखल्यांचे दर दुपटीने तर काही दाखल्यांचे तिपटीने वाढवले याबाबत प्रशासनाने पुन्हा एकदा या दराबाबत फेरविचार करून एकाच वेळी जास्त दर वाढवू नका अशी सूचना नगराध्यक्षांनी केली. तसेच दराबाबत फेरविचार करून दर कमी केलेली दरपत्रक हे पुन्हा सभेमध्ये ठेवा असेही त्यांनी सांगितले. जन्म मृत्यू दाखल्यांचे दर वाढवू नका अशी मागणी जयेश धुमाळे यांनी केली. त्यावर मुख्याधिकाऱ्यांनी सदर दराबाबत चर्चा करून पुन्हा काही समिती समोर हा विषय ठेवला जाईल व त्यानंतर सभेमध्ये आणला जाईल अशी ग्वाही दिली.
मसुरकर किनई रोड ते गांगो मंदिर व शहरातील इतर रस्त्यांच्या ट्राफिक बाबत सर्वेसाठी एजन्सी नेमणे हा ठराव घेण्यात आला. परंतु अशाप्रकारे सर्वे करून यातून आपण निष्पन्न काय करणार? तुमच्या एखाद्या कार्यकर्त्याला एजन्सीचा ठेका मिळेल व यातून त्याला पैसे मिळतील शहराचा फायदा काय? असा सवाल हर्णे यांनी केला.शहरात अनेक रस्त्यांवर महामार्गाच्या सर्विस रस्त्यांवर ट्राफिक जाम ही समस्या असते असे नगराध्यक्षांनी सांगितले. त्यावर हर्णे यांनी हे सर्वेक्षण झाल्यावर आपल्याला कणकवली शहरात टोल बसवता येईल काय? असा उपहासात्मक सवाल केला.
कणकवली शहरातील सर्व मालमत्तांची समान कर आकारणी करण्याबाबतची सूचना मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी मांडली. गेली वर्ष आपण ग्रामपंचायत मधील घरे व नगरपंचायत मधील घरे अशा आकारणी मध्ये सूट दिली. मात्र आता पोर्टलवरून सूचना आल्यामुळे हा निर्णय घ्यावाच लागणार. सर्वांना सुविधा सारख्याच देतो. त्यामुळे सर्वांना कर समानच असावा लागेल. असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील नागरिकांवर कर आकारणी मध्ये अन्याय करून चालणार नाही. परंतु आता मी नगराध्यक्ष झाल्यावर दरात वाढ केली असा लोकांमध्ये मेसेज जाईल. त्यामुळे प्रशासकीय राजवट असताना ही दरवाढ केली असती तर बरं झालं असतं. या कारणामुळे आमच्या नोकऱ्या जाण्याची वेळ आली. असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले
त्यावर नगरसेवक हर्णे यांनी ठराव मंजूर केला नाही तर तुम्ही काय करणार? असा सवाल केला. त्यावर मुख्याधिकाऱ्यांनी विरोध केल्यास तशी नोंद घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे हा ठराव पाठवला जाईल व त्यांच्याकडून आदेश येईल त्याप्रमाणे पुढील कार्यवाही होईल. आम्ही सदर आकारणीबाबत काय प्रयत्न केले ते देखील जिल्हाधिकाऱ्यांना दाखवून देणार. यापूर्वी असे किती ठराव चुकीचे असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाला पाठवलात असा सवाल हर्णे यांनी केला. त्यावर बाकीच्या विषयांचं येथे उदाहरण नको असे मुख्याधिकारी यांनी सांगितले. संपूर्ण शहरात किती घरांचा कर वाढतो किती आकारणी होते त्याचा अहवाल सभागृहात सादर करा अशा सूचना नगराध्यक्षांनी दिल्या. आदेश आला म्हणजे कार्यवाही करायला पाहिजे असे नाही. आतापर्यंत प्रशासनाकडे शेकडो फायली पडून आहेत. लोकांची शहरात बोंबाबोंब होईल असे नगराध्यक्ष नी सांगितले. शहरात अनेक गोष्टींवरून बोंबाबोंब होणार त्यात अजून ही एक भर पडेल असा टोला बंडू हर्णे यांनी लगावला. हा निर्णय कोणाच्या विरोधात आकास बाळगून मी करत नाही. मला नोटीसा आल्या. त्या मी पाहिजे तर तुम्हाला पाठवून देते. हा माझा पर्सनल विषय नाही. वरिष्ठांचे आदेश आहेत. व त्याप्रमाणे कार्यवाही करणे गरजेचे आहे अशी भूमिका मुख्याधिकाऱ्यांनी मांडली.
कणकवली शहरातील अनधिकृत अतिक्रमणांवर निर्णय घेण्याच्या सूचना संदेश पारकर यांनी दिला. अनधिकृत अतिक्रमणांची यादी बनवा व त्यानुसार कारवाई करा असा ठराव या बैठकीत घेण्यात आला.
कणकवली शहरातील भटक्या कुत्र्यांची मोहीम थांबली का? असा सवाल आर्या राणी यांनी केला. ही मोहीम राबवणारी संस्था जिल्ह्यात एकमेव आपल्याकडे आली आहे. मात्र तिच्याकडे जिल्ह्यातील अन्य नगरपालिकांची जबाबदारी आहे. याबाबत कुडाळ नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असून त्यांचं काम झाल्यावर आपल्याकडे ही संस्था पुन्हा कार्यान्वित होणार आहे. पहिल्या टप्प्याचे काम झालं आहे उर्वरित काम लवकर पूर्ण करणार आहे तसेच चुकीच्या पद्धतीने कुत्र्यांना पकडले तर कारवाईचा बडगा उगारला जातो त्यामुळे नियमाच्या बाहेर जात हे काम करता येणार नाही असे मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले. भटक्या कुत्र्यांचा त्रास जनतेला होत असून अनेकांच्या तक्रारी येतात कार्यवाही करा अशी मागणी श्री पारकर यांनी केली.
दिगंबर वालावलकर कणकवली





