कणकवली येथे ३० रोजी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा

चेतना ट्रेडर्स कट्टाच्या वतीने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा गुरुवार दिनांक ३० रोजी लक्ष्मी विष्णू हॉल कॉलेज रोड कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेसाठी विजेत्यास रोख रक्कम रु ३००० व चषक , उपविजेत्यास रोख रक्कम रु २००० व चषक , तृतीय क्रमांक रोख रक्कम रु १००० व चषक , चौथा व पाचवा क्रमांक रोख रक्कम रु ७ ५० तसेच सहा ते दहा क्रमांकापर्यत रोख रक्कम रु ५oo देऊन गौरविण्यात येणार आहे लहान मुलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ९ , ११, १३, १५ वर्षाखालील गटानांही चषक व पदक देण्यात येईल स्पर्धा सकाळी १० वा सुरु होईल नाव नोंदणीसाठी ९४२२३८१९४९ येथे संपर्क साधण्याचे आवाहन आयोजक प्रसाद साळकर यांनी केले आहे

error: Content is protected !!