कोकण नाऊ सावंतवाडी पर्यटन महोत्सवात रंगणार सौंदर्याचा अविष्कार; ‘कोकण नाऊ क्वीन’ खुल्या फॅशन शो स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी:प्रतिनिधी कोकण नाऊ चॅनेल आयोजित ‘कोकण नाऊ सावंतवाडी पर्यटन महोत्सव २०२६’ अंतर्गत येत्या २५ एप्रिल रोजी भव्य खुल्या “फॅशन शो” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.’कोकण नाऊ क्वीन’ या नावाने होणारी ही स्पर्धा केवळ एक फॅशन शो नसून,कोकणातील महिलांच्या कला,मेहनत आणि आत्मविश्वासाला व्यासपीठ मिळवून देणारा एक उत्सव ठरणार आहे.
जिमखाना मैदान,सावंतवाडी येथे १७ एप्रिल ते २६ एप्रिल या कालावधीत हा महोत्सव पार पडत आहे.या महोत्सवातील मुख्य आकर्षण असलेल्या या फॅशन शो स्पर्धेचे आयोजन शनिवार,२५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता करण्यात आले आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना खालीलप्रमाणे बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे:
प्रथम क्रमांक: ८०००/- रुपये,सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र.
द्वितीय क्रमांक: ५०००/- रुपये,सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र.
विशेष पारितोषिके: बेस्ट पर्सनालिटी,बेस्ट स्माईल,बेस्ट टॅलेंट आणि बेस्ट कॅटवॉक या श्रेणीतील विजेत्यांना प्रत्येकी सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाईल.
या दहा दिवसीय महोत्सवात फूड फेस्टिव्हल, फन फेअर,सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये वेशभूषा स्पर्धा,डबलबारी भजन, महिलांसाठी खेळ पैठणी, लावणी स्पर्धा,फुगडी जुगलबंदी,एकेरी नृत्य स्पर्धा, डान्स शो,दशावतारी नाटक डॅाग अँड कॅट शो, कराओके स्पर्धा,दशावतारी नाटक अश्या कार्यक्रमांच आयोजन केले आहे.तसेच ऑटोमोबाईल,प्रॉपर्टी, फर्निचर आणि हँडलूम यांसारख्या विविध दालनांचे प्रदर्शनही येथे असणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी ९३७०४४०८९३ किंवा ८४०८९२९९२३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

error: Content is protected !!