आचरा येथे २५ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय कराओके गीत गायन स्पर्धा

रॉयल मालवणी सिंधुदुर्ग यांच्या वतीने आचरा येथे जिल्हास्तरीय कराओके गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३.०० ते सायंकाळी ८.०० या वेळेत लौकिक सांस्कृतिक भवन (हॉटेल सिरॉक शेजारी), आचरा, ता. मालवण येथे होणार आहे.

या स्पर्धेसाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली असून प्रथम पारितोषिक म्हणून चषक व रुपये ६६६६, द्वितीय पारितोषिक म्हणून चषक व रुपये ४४४४, तर तृतीय पारितोषिक म्हणून चषक व रुपये २२२२ देण्यात येणार आहेत. याशिवाय स्पर्धकांना आकर्षक मेडल्स, प्रमाणपत्रे तसेच एक उत्तेजनार्थ पारितोषिकही दिले जाणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रथम नोंदणी करणाऱ्या ३० स्पर्धकांना प्राधान्य दिले जाणार आहे. स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे. पहिल्या फेरीत स्पर्धकांना मराठी गीतातील मुखडा व पहिला अंतरा सादर करावा लागेल. या फेरीतून सर्वोत्तम १५ स्पर्धकांची निवड करण्यात येऊन त्यांना दुसऱ्या फेरीत हिंदी गीत पूर्ण सादर करावे लागणार आहे. स्पर्धेचे परीक्षण स्वरबद्धता, तालबद्धता, एक्सप्रेशन्स, गाण्याची निवड व एकूण सादरीकरण या निकषांवर केले जाणार आहे. स्पर्धकांनी नोंदणी निश्चित केल्यानंतर आपले दोन्ही कराओके ट्रॅक आयोजकांनी दिलेल्या ई-मेलवर पाठवणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी डॉ. सिद्धू सकपाळ (९४२०८९०८१०), डॉ. अमोल हुले (९४२२४३६७७१) तसेच श्री. संदेश रावले (९३२५८६८१७८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!