खासदार नाम.नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिम्मित शिवसेने मार्फत भव्य आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन

कोकणचे भाग्यविधाते आणि माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, खासदार नाम. नारायण राणे यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान (कणकवली), रोटरी क्लब खारेपाटण आणि शिवसेना खारेपाटण विभाग यांच्या मार्फत हे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक: १० एप्रिल
स्थळ: शेठ न. म. हायस्कूल, खारेपाटण
वेळ: सकाळी ९:३० ते दुपारी १:००
आयोजक -सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान (कणकवली), रोटरी क्लब खारेपाटण आणि शिवसेना खारेपाटण विभाग.
उपलब्ध तपासण्या:
शिबिरात खालील तपासण्या मोफत किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केल्या जातील:
सर्वसाधारण आरोग्य तपासणी
रक्तातील साखर (Sugar) आणि रक्तदाब (BP)
ईसीजी (हृदय तपासणी)
व्हेरिकोज व्हेन्स आणि अस्थिरोग (हाडे व सांधे) तपासणी
मज्जासंस्था (मेंदू व मणका) तपासणी
किडनी स्टोन आणि कर्करोग तपासणी
नाव नोंदणीसाठी संपर्क:
सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा:
१. श्री. मंगेश गुरव: ९४२२४३३७६०
२. श्री. सुहास राऊत: ९५९५७१७१२१
या शिबिरामध्ये सहभागी होत जास्तीत जास्त रक्तदान करावे तसेच आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी केले आहे.

error: Content is protected !!