राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे आणि सोमस्थ अकॅडमी वरवडे यांचा आगळा वेगळा उपक्रम

“अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांची साकारली चित्रकृती “
कणकवली/मयूर ठाकूर
ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनिअर कॉलेज कॉमर्स आणि सायन्स वरवडे आणि सोमस्थ अकॅडमी वरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने एक आगळावेगळा उपक्रम आयडियल इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर घेण्यात आला. अनाथांची माय पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांची चित्रकृती साड्या आणि टॉवेल च्या मदतीने साकारण्यात आली
सर्वप्रथम या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडले,त्यानंतर अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांची चित्रकृती साकारली गेली या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमासाठी सविता आश्रम तसेच दिविजा आश्रम या दोन आश्रमातील आजी आजोबा उपस्थित होते त्यांच्या समक्ष हा आगळावेगळा अशा प्रकारचा उपक्रम साजरा करण्यात आला.राष्ट्रीय विज्ञान दिन हा थोर शास्त्रज्ञ सी. वी.रमण यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो मात्र सी. वी.रमण यांनी वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधन केलं तर खऱ्या अर्थाने अनाथ मुलांना त्यांच्या भावना त्यांची दुःख याच्यावर संशोधन करण्याचे काम कोणी केलं असेल तर ते सिंधुताई सपकाळ यांनी खऱ्या अर्थाने स्वतः संघर्षमय जीवन जगत असताना सुद्धा इतर मुलांना या संघर्षाच्या वाटेवरून सुखाच्या वाटेकडे दुःखाचे सावट दूर करणारी अनाथांची माय अर्थातच सिंधुताई सपकाळ म्हणजेच विज्ञान आणि समाजसेवा या दोन गोष्टींचा अनमोल अशा प्रकारचा संगम आज या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून आयडियल इंग्लिश स्कूल आणि सोमस्थ अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने घडवण्यात आला. या उपक्रमासाठी या संपूर्ण कार्यक्रमासाठी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे सर,उपाध्यक्ष मोहन सावंत सर, कार्याध्यक्ष बुलंद पटेल सर, संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर, संस्थेच्या संचालिका गौसिया पटेल मॅडम, संचालिका मनीषा सावंत मॅडम, संचालिका सुरेखा भिसे मॅडम,सीईओ डी.पी तानावडे सर, संस्था सदस्य अनंत बडे सर,आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई मॅडम,सोमस्थ अकॅडमी चे श्री योगेश सामंत सर,त्याचप्रमाणे कणकवली नगरपंचायत च्या माजी नगराध्यक्ष मेघा गांगण मॅडम,काळसेकर मॅडम, रावराणे मॅडम, पूर्व प्राथमिक शाळा मान्यता परिषद भारत च्या विस्तार अधिकारी सौ. रुपाली कदम मॅडम,कणकवली निधी अर्बन बँकेचे सीईओ रंजन चव्हाण सर, तसेच सविता आश्रम पणदूर आणि दिविजा आश्रम असलदे या आश्रमाचे पदाधिकारी त्याचप्रमाणे या दोन्ही आश्रमातील आजी-आजोबा उपस्थित होते .
साड्या आणि बाथ टॉवेल यांच्या मदतीने साकारण्यात आलेले चित्रकृती मधील साड्या आणि टॉवेल या दोन्ही आश्रमातील आजी आजोबांना भेटवस्तू स्वरूपात देण्यात आल्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी कणकवलीतील आणि कणकवली बाहेरील अनेक दात्यांचे आम्हाला बहुमोल अशा प्रकारचे सहकार्य लाभले संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानदा शिक्षण संस्था त्याचप्रमाणे सोमस्थ अकॅडमी वरवडे आयडियल इंग्लिश स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली ही चित्रकृती तयार करण्याची संकल्पना मांडली ते श्री.सिद्धेश साळसकर सर (कुडाळ) तसेच ही चित्रकृती साठी ज्यांनी विशेष मेहनत घेतली त्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या कलाशिक्षिका रजनी चव्हाण मॅडम यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्याचप्रमाणे दोन्ही आश्रमातील आजी आजोबा आणि स्वयंसेवक म्हणून आयडियल इंग्लिश स्कूलचे इयत्ता नववीचे विद्यार्थी या सगळ्यांनी विशेष मेहनत घेतली या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे सहाय्यक शिक्षक हेमंत पाटकर सर यांनी केले.





