कोकण नाऊ कणकवली महोत्सवात रंगणार भव्य ‘कॅट अँड डॉग शो’; पशुप्रेमींसाठी मोठी पर्वणी!

​कणकवली/मयूर ठाकूर येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर ‘कोकण नाऊ कणकवली महोत्सव’ मोठ्या उत्साहात सुरू होतोय.या महोत्सवाचे खास आकर्षण ठरणारा ‘भव्य कॅट अँड डॉग शो’ येत्या बुधवारी ०४ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.कोकण नाऊ आयोजित या महोत्सवात भव्य स्वरूपाचे प्राण्यांचे प्रदर्शन होत असल्याने पशुप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.​​या प्रदर्शनात विविध प्रकारच्या आणि दुर्मिळ प्रजातींच्या श्वानांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.केवळ श्वानच नव्हे,तर मांजरांच्या विविध प्रजातीही या शोचे आकर्षण असणार आहेत.पाळीव प्राण्यांच्या अंगभूत गुणांचे सादरीकरण आणि त्यांचे सौंदर्य न्याहाळण्याची संधी यानिमित्ताने कणकवलीकरांना मिळणार आहे.27 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत हा महोत्सव संपन्न होत असून बुधवार ४ मार्च २०२६ रोजी भव्य कॅट अँड डॉग शो हा कार्यक्रम आयोजित केला आहे.महोत्सव सायंकाळी ४.०० ते रात्री १०.०० या वेळेत सुरू राहणार आहे.उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदान, कणकवली येथे हा महोत्सव संपन्न होईल तर फूड फेस्टिव्हल,फन फेअर, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ऑटोमोबाईल,फर्निचर, हँडलूमचे भव्य स्टॉल्स यां महोत्सवाचे आकर्षण असेल.
​भव्य कॅट अँड डॉग शो ​या शोमध्ये आपल्या लाडक्या श्वान किंवा मांजरासह सहभागी होण्यासाठी पशुप्रेमींना आवाहन करण्यात येत आहे. नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी अनुप मोडक (७५०७५०२२७२) यांच्याशी किंवा ९३७०४४०८९३ / ८४०८९२९९२३ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.​”कोकणातील पशुप्रेमींना एक व्यासपीठ मिळावे आणि विविध प्रजातींची माहिती सर्वसामान्यांना व्हावी,या उद्देशाने या शोचे आयोजन करण्यात आले आहे.जास्तीत जास्त नागरिकांनी या सोहळ्याचा आनंद घ्यावा.”असे आवाहन कोण नाऊ चॅनेल कडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!