कणकवली नगरपंचायत चा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध

शहरातील अनेक आरक्षणाच्या मुद्द्यावरून येत्या काळात राजकारण तापणार

सूचना व हरकती दाखल करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी

कणकवली नगरपंचायत चा प्रारूप विकास आराखडा कणकवली नगरपंचायत मध्ये प्रसिद्ध करण्यात आला असून, या प्रारूप आराखड्यावर सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. सूचना व हरकती सादर करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी देण्यात आला असून या आराखड्याच्या प्रस्तावित आरक्षणाच्या मुद्द्यावरून येत्या काळात कणकवली शहरातले राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. तसेच काही आरक्षणे ही नव्याने टाकली जाण्याची शक्यता असल्याने आज पासून कणकवली नगरपंचायत मध्ये अनेकांची प्रसिद्ध केलेला प्रारूप आराखडा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. लवकरच याबाबतची पुढील कार्यवाही होणार आहे. सूचना व हरकती देण्याकरिता सहाय्यक संचालक नगर रचना विभाग यांना प्राधिकृत करण्यात आले असून नगर रचना विभागाच्या सहाय्यक संचालक नाजनीन मोमिन यांनी हा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे. 27 मार्च पर्यंत या प्रारूप आराखड्यावर सूचना व हरकती मागवण्यात आल्या आहेत. नगर रचना विभाग सिंधुदुर्ग व कणकवली नगरपंचायत या ठिकाणी या सूचना व हरकती लेखी स्वरुपात देता येणार आहेत.

error: Content is protected !!