भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसाठी कणकवली नगरपंचायत ॲक्शन मोडवर

गुरुवार पासून शहरात कुत्र्यांना पकडण्याची मोहीम सुरू

एका खाजगी एजन्सीच्या मदतीने नगरपंचायत मार्फत करणार कुत्र्यांची नसबंदी

कणकवली शहरातील भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून भटके कुत्रे पकड मोहीम गुरुवारपासून सुरू करण्यात आली. लवकरच या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेचा अधिकृत शुभारंभ केला जाणार आहे. कुत्र्यांना पकडल्यानंतर त्यांची नसबंदी करून त्‍यानंतर ज्या ठिकाणाहून हे कुत्रे आणले त्‍याच ठिकाणी ते परत आणून सोडले जाणार आहेत. एका खाजगी संस्थेच्या माध्यमातून नगरपंचायत मार्फत हा उपक्रम हाती घेतला जात आहे. कणकवली शहरात भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. कणकवली शहरात गेल्‍या काही महिन्यात भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव वाढला होता. शहरातील नागरिकांना हे कुत्रे चावा घेत होते. दुचाकी वाहनांचा पाठलाग करून असल्‍याने दुचाकीस्वारांचे अपघात होण्याच्याही घटना वाढल्‍या होत्या. याखेरीज दुचाकीला लावलेल्‍या पिशव्यांतील साहित्‍य देखील या कुत्र्यांकडून पळवले जात होते. सध्या जाळ्याचा वापर करून भटकी कुत्री पकडली जात आहेत. दरम्यान कणकवली नगरपंचायत च्या या उपक्रमाबद्दल शहरवासीयांमधून समाधान व्यक्त होत असून हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवण्याची देखील मागणी केली जात आहे.

error: Content is protected !!