आंबोली पब्लिक स्कूल आयोजित राज्यस्तरीय जुडो- कराटे स्पर्धेमध्ये शेठ न.म. विद्यालय, खारेपाटणच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश

आंबोली पब्लिक स्कूल आयोजित राज्यस्तरीय जुडो कराटे स्पर्धा रविवार दिनांक 1 2 2026 रोजी आंबोली पब्लिक स्कूल येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट क्रीडा प्रदर्शन करीत घवघवीत यश संपादन केले. यामध्ये खालील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
कु. सुखदा संतोष राऊत- गोल्ड मेडल
कु. समर्थ गोपालनाथ ठाकूर- गोल्ड मेडल
कु. श्रेया श्रीकृष्ण राऊत- सिल्वर मेडल
कु. मनस्वी महेश राऊत – सिल्वर मेडल
कु. मनस्वी महेश सकपाळ – प्रशस्तीपत्र
कु. आर्यन अनिल कोवळे – ब्राँझ मेडल
कु. हर्ष रमेश तावडे – प्रशस्तीपत्र
वरील यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक श्री राठोड सर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष श्री. रघुनाथ राणे, सचिव श्री. महेश कोळसुलकर, सर्व विश्वस्त, प्रशालेचे प्राचार्य श्री. संजय सानप, पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत सर्व शिक्षक वृंद यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

error: Content is protected !!