राज्यस्तरिय हापकिडो बॉक्सिंग स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूलची अनुष्का गाडे हिची गोल्ड मेडल मिळवत राष्ट्रीय स्तरावर निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर, अहिल्यानगर जिल्हा हापकिडो बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय हापकिडो बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले होते. या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूलची कुमारी अनुष्का ज्ञानेश्वर गाडे हिने गोल्ड मेडल मिळवत राष्ट्रीय स्तरावर भरारी घेतली. हापकिडो बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर जाणारी ती सिंधुदुर्ग मधील पहिली खेळाडू ठरली आहे. हापकिडो ही एक कोरियन मार्शल आर्ट असून ती लांब पल्ल्याच्या आणि जवळच्या लढाईच्या तंत्रांचा वापर या क्रीडा प्रकारात केला जातो.
अहिल्यानगर येथे पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय हापकिडो बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करत राष्ट्रीयस्तरावर भरारी घेतली आहे. यामध्ये खालील वयोगटातील विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.
वजन गट 42 किलो मुली
१) अनुष्का ज्ञानेश्वर गाडे गोल्ड मेडल
वजन गट 45 किलो मुली
२) अनुष्का संतोष धुवाळी सिल्व्हर मेडल
वजन गट 48 किलो मुली
३) रिया दीपक वाघरे सिल्व्हर मेडल –
वजन गट 60 किलो मुली
४) सानिया सतीश पवार सिल्व्हर मेडल
वजन गट 54 किलो मुली
५) सानिका टोपणा गावडे सिल्वर मेडल
वजन गट 51 किलो मुली
६) तेजस्वी प्रवीण मिशाळ तृतीय क्रमांक
वजन गट 39 किलो मुली
७) कुमारी. त्रिवेणी विशाल परब तृतीय क्रमांक
वजन गट 63 किलो मुली
८) श्रावणी शिवाजी कानडे तृतीय क्रमांक
वजन गट 46 किलो मुले
९) अर्णव गणेश जामसंडेकर सिल्वर मेडल
वजन गट 67 किलो मुले
१०) अहमद रजा फैयाज पावसकर सिल्वर मेडल
वजन गट 61 किलो मुले
११) सोहम राजेंद्र पवार तृतीय क्रमांक
वजन गट 49 किलो मुले
१२) सम्मेद अजित उपाध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील क्रीडा शिक्षक श्री पाडवी सर आणि भिसे सर,सहायक शिक्षिका सौ. सारिका महिंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले.
दक्षिण आशिया टेकयान महासंघाचे महासचिव एड. श्री. राज वागदकर आणि जिल्हा हापकिडो बॉक्सिंग असोसिएशन सिंधुदुर्ग चे अध्यक्ष श्री. संजय सानप यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या क्रीडा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष श्री.भाऊ राणे सचिव श्री. महेश कोळसुलकर सर्व विश्वस्त, प्राचार्य श्री. संजय सानप पर्यवेक्षक श्री संतोष राऊत, सर्व शिक्षक वृंद आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.





