कणकवली शहरातील प्रथितयश डॉ. धैर्यशील चंद्रकांत राणे यांना फेलोशीप

एशियन ॲकॅडमी ऑफ लेझर थेरपी (AALT) व सेंट्रल ख्रिश्चन युनिव्हर्सिटी सिंगापूर तर्फे डेंटल लेझर थेरपीमध्ये ‘असोसिएट मार्फत फेलोशिप
डॉ. धैर्यशील चंद्रकांत राणे यांचे केले जातेय अभिनंदन
कणकवली : कणकवली येथील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. धैर्यशील चंद्रकांत राणे यांनी लेझर थेरपी क्षेत्रातील अभ्यासक्रम, क्लिनिकल प्रशिक्षण, कौशल्य मूल्यांकन व व्यावसायिक विकासाच्या आवश्यक बाबी यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल Asian Academy of Laser Therapy (AALT) तर्फे ‘Associate Fellow’ ही फेलोशिप प्राप्त केली आहे.
या प्रशिक्षणामध्ये Laser Physics, Laser Safety, Clinical Applications आणि Evidence-Based Photomedicine या विषयांतील कौशल्यांचा समावेश आहे.
ही फेलोशिप डॉ. धैर्यशील राणे यांच्या लेझर दंतचिकित्सा क्षेत्रातील व्यावसायिक कौशल्यवृद्धीसाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
डॉ. धैर्यशील चंद्रकांत राणे यांच्या या यशाबद्दल कणकवली व परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
कणकवली प्रतिनिधी






