कणकवली नगरपंचायत च्या विरोधी गटनेत्या सुप्रिया नलावडे यांचा तालुका भाजपाच्या वतीने सत्कार

पीएचडी पदवी मिळवल्याबद्दल भाजपा कडून पुढील वाटचालीस शुभेच्छा

कणकवलीच्या नगरपंचायत च्या विरोधी गटनेत्या नगरसेविका सुप्रिया समीर नलावडे यांना पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा कणकवली तालुका भाजपाच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी भेट घेत सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, कणकवली भाजपाचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाजपाचे शहराध्यक्ष अण्णा कोदे, सचिन पारधीये, अभय घाडीगावकर, प्रशांत राणे, सुभाष मालंडकर, नयन दळवी, अमोल रासम, स्वप्निल चिंदरकर, प्रज्वल वर्दम आदी उपस्थित होते. सुप्रिया समीर नलावडे यांनी डीप लर्निंगच्या माध्यमातून ‘Sentiment Analysis’ विषयावर संशोधन करत ही पदवी संपादन केली होती. लवकरच हा पदवीदान समारंभ होणार आहे. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!