शिवसेना पुरस्कृत नारळ लढविणे स्पर्धेत नरेश गावकर विजेते

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची उपस्थिती ठरली उत्साह वाढवणारी

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची उपस्थिती आणि कार्यकर्त्यांचा उत्साह प्रत्येक फेरीगणीक वाढणारी चुरस यामुळे आचरा शिवसेना पुरस्कृत नारळ लढविणे स्पर्धा चुरशीची झाली होती.यास्पर्धेत नरेश गावकर यांनी इतर स्पर्धकांवर मात करत विजयी ठरले.त्यांना रोख पंधरा हजार आणि चषक देऊन गौरविण्यात आले.उपविजेते ठरले ते वैभव खुरंदळे तर तृतीय क्रमांक युवराज वायंगणकर यांनी पटकावला. शिवसेना आचरा विभागातर्फे आयोजित नारळ लढविणे स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद लाभला या स्पर्धेत चतुर्थ क्रमांक भावेश पाटील तर पाचवा क्रमांक रोहन पाताडे यांनी मिळविला.मोठ्या रकमेची बक्षिसे आणि आकर्षक चषक या स्पर्धेचे आकर्षण ठरले होते.या स्पर्धेचे बक्षीस वितरण शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी संजय आंग्रे , उपजिल्हाप्रमुख महेश राणे,तालुकाप्रमुख विनायक बाईत, आचरा विभागीय अध्यक्ष संतोष कोदे,पं समिती सदस्य गणेश तोंडवळकर,आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस,किसन मांजरेकर,अभय भोसले, मनोज हडकर,भाऊ हडकर,विजय कदम,हर्षद धुरी, यांसह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.या स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी स्पर्धा स्थळी गर्दी उसळली होती .

error: Content is protected !!