पीएचडी पदवी मिळवल्याबद्दल नगरसेविका सुप्रिया समीर नलावडे यांचा नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते सत्कार

नगरपंचायत च्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी देखील प्रशासनाच्या वतीने केला सत्कार

कणकवली नगरपंचायत च्या नगरसेविका सुप्रिया समीर नलावडे यांनी पीएचडी पदवी मिळवल्याबद्दल त्यांचे कणकवली नगरपंचायत च्या वतीने आज नगरपंचायत च्या सर्वसाधारण सभेनंतर सत्कार करत अभिनंदन करण्यात आले. कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर व मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक नगरसेवक प्रतीक्षा सावंत मेघा सावंत मनस्वी ठाणेकर मेघा गांगण आर्या राणे सुमेधा अंधारी स्वप्निल राणे राकेश राणे रुपेश नार्वेकर संकेत नाईक संजय कामतेकर जाई मुरकर बाळू पारकर दीपिका जाधव आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!