नेरूर मध्ये महायुतीला ग्राम विकास आघाडीचे आव्हान

ग्राम विकास आघाडीला उबाठाचा पाठिंबा
कुडाळ : नेरूर जिल्हा परिषद मतदार संघात नेरूर पंचक्रोशी ग्राम विकास आघाडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे इतर ठिकाणी महायुती विरोधात ठाकरे सेना अशी होणारी निवडणूक नेरूर मध्ये मात्र ग्राम विकास आघाडीच्या प्रवेशाने वेगळ्या वाटेने लढली जाणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अवघे काही दिवसच हातात असल्याने निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांनी प्रचारासाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. कुडाळ तालुक्यात महायुती विरुद्ध ठाकरे सेना अस चित्र असताना नेरूर जिल्हा परिषदेची निवडणूक मात्र वेगळ्या वाटेने जाताना दिसत आहे. नेरूर मध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार रुपेश पावसकर हे अपक्ष म्हणून उभे आहेत. ग्रामविकास आघाडी तर्फे श्री पावसकर निवडणूक लढवत असताना त्यांना ठाकरे सेनेने पाठिंबा दिल्याने नेरूर मधील महायुतीचे उमेदवार संजय पडते यांच्या समोर नेरूर पंचक्रोशी ग्राम विकास आघाडीचे आव्हान उभं राहिल्याच चित्र दिसत आहे.
नेरूर मधून जिल्हा परिषद साठी सुरुवातीला 4 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पण अर्ज मागे घेतेवेळी ठाकरे सेनेच्या विजय लाड यांच्यासह मंगेश बांदेकर या अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला. त्यामुळे महायुतीचे उमेदवार संजय पडते आणि भाजपचे बंडखोर उमेदवार रुपेश पावसकर यांच्यात थेट लढत होणार आहे. तर पंचायत समितीसाठी नेरूर उत्तर मधून शिवसेना महायुतीच्या नीता भास्कर नाईक आणि ठाकरे सेनेच्या दीप्ती नाईक यांच्यात लढत होणार आहे. नेरूर दक्षिण मधून ठाकरे सेनेच्या अर्चना बंगे विरुद्ध भाजपा महायुतीच्या ममता देसाई यांच्यात लढत होणार आहे.
दरम्यान नेरूर पंचक्रोशी ग्राम विकास आघाडीचे उमेदवार यांनी आज श्री देव कलेश्वराचे आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात केली. आज त्यांच्या प्रचार कार्यलयाचे उदघाटन माजी आमदार वैभव नाईक आणि ज्येष्ठ नागरिक श्री गावडे यांच्या हस्ते करण्यात आलं.
यावेळी माजी आमदार वैभव नाईक, अतुल बंगे, जिल्हा परिषदेचे उमेदवार रुपेश पावसकर, नेरूर उत्तर प स च्या उमेदवार दीप्ती नाईक, नेरूर दक्षिण प स च्या उमेदवार अर्चना बंगे, शेखर गावडे, विजय लाड, मंगेश बांदेकर, भास्कर गावडे, गिरीश नेरुरकर, श्यामसुंदर परब, श्यामसुमदार करलकर,सचिन परब, संतोष कदम, अजय राणे,वैभव सरमळकर, भूषण गावडे, अमोल शृंगारे, सचिन गावडे, प्रवीण नेरुरकर, नरेंद्र नाईक, प्रदीप नाईक, आबा नाईक, राजन पावसकर, श्रीधर नाईक यांच्यासह नेरूर पंचक्रोशीतिल ग्रामस्थ उपस्थित होते.





