कणकवली शहरात रेल्वे ट्रॅकच्या दुतर्फा रस्ता बनवणार!

नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केली पाहणी
कणकवली शहरातील जनतेला फायदा होणार
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वेच्या हद्दीतून दुतर्फा जोडमार्ग करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर व उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी सांगितले.कणकवली नगरपंचायत चे कर्मचारी, इंजिनियर यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक संकेत नाईक, निकेत मुरकर उपस्थित होते. कणकवली रेल्वे ट्रॅक च्या बाजूने कनकनगर रोड ते हळवल पर्यंत व तसेच बांधकारवाडी येथे दुतर्फा रोड साठी प्रयत्न करणार, यामुळे वाडी – वाडीतील रस्ते जोडले जातील. याचा फायदा तेथील नागरिकांना होईल.
संदेश पारकर म्हणाले, कणकवली शहराच्या विकासासाठी असे जोडमार्ग होणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी मोठ्या वाहतुकीस अडचण होते अश्या नागरिकांसाठी हा जोडमार्ग होणे गरजेचे आहे. अत्यावश्यक वेळेला अग्निशामक दल त्या ठिकाणी जाण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. काही नागरिकांना वाहतुकीस अरुंद रस्ता आहे या नागरिकांसाठी पर्यायी रस्ता म्हणून याची उपाययोजना चालू आहे.
सुशांत नाईक म्हणाले, कनकनगर प्रभागात सुद्धा अरुंद रस्ता आहे. ज्या ठिकाणी एकेरी वाहतूक नागरिकांना करावी लागत आहे. नागरिकांना दुहेरी वाहतूक करता यावी यासाठी बाहेरून पर्यायी मार्ग म्हणून व्हावा यासाठी आमचे प्रयन्त चालू आहेत. या पर्यायी मार्गामुळे कनकनगर व बांधकरवाडी येथील नागरिकांना वाहतूक सोयीस्कर ठरणार आहे.





