विजया चव्हाण यांचे वृद्धापकाळाने निधन

कुडाळ तालुक्यातील सरंबळ- सोनबडे येथील मुळ रहिवासी व सध्या कणकवली मधलीवाडी येथे राहत असलेल्या बिजया नारायण चव्हाण (९०) यांचे बुधबारी वृद्धापकाळाने निधन झाले. सध्या त्या आपल्या मुलींकडे कणकवली येथे राहत होत्या. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई, बहीण, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. कणकवलीतील टेलर अजित सावंत यांची सासू तर दैनिक पुढारीच्या कणकवली कार्यालयातील ऑपरेटर शिवाली सावंत यांची आजी होत.





