“काल, आज, आणि उद्या नितेश साहेबांसोबत”!

“त्या” स्टेटस नंतर संतोष कानडे यांचे पालकमंत्र्यांप्रती निष्ठा दाखवणारे स्टेटस चर्चेत

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आहे शेवटचा दिवस

जिल्हा परिषद निवडणुकीकरिता उमेदवारी नाकारली गेल्यानंतर भाजपाचे पदाधिकारी संतोष कानडे यांचे पालकमंत्र्यांवर रोख धरणारे स्टेटस चर्चेत आले होते. “पालकमंत्र्यांना रामराम, गोट्या सावंत यांना सलाम” अशा आशयाच्या स्टेटस ने कणकवलीच्या राजकारणात एकच खळबळ उडून दिली होती. मात्र त्यानंतर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना आज संतोष कानडे यांनी ठेवलेले स्टेटस पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे. या ठेवलेल्या स्टेटस मध्ये बुवा संतोष कानडे यांनी म्हटले आहे “दाखवाल ती दिशा, सांगाल तो मार्ग, द्याल ती जबाबदारी!, शब्द ही भावना होती, निष्ठा ही श्रद्धा आहे, काल, आज, उद्याही नितेश साहेबांसोबत! असे स्टेटस संतोष कानडे यांनी ठेवल्याने संतोष कानडे यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा आहे.

error: Content is protected !!