एस पी एस फार्मसी कॉलेज मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

भारत स्वातंत्र्य लढ्यातील अग्रेसर नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती श्री. पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजमध्ये साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात श्री सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन व दिप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर कु. अक्षता जाधव, कु.धनश्री कुपेरकर, ज्ञानदा मेस्त्री, व भावेश मेस्त्री, ह्या विद्यार्थ्यांनी नेताजींचं स्वातंत्र्यलढ्यातील कार्य,नेतृत्व आदि विषयावर मुद्देसूद भाषणे केली. या प्रसंगी प्राचार्य डॉ.युवराज पांढरे,शिक्षक शि‌क्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

error: Content is protected !!