संशोधन समाजासाठी उपयुक्त व मार्गदर्शक व्हावे – डॉ. मिलिंद काळे

बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज कुडाळ येथे तीन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

कुडाळ : आपले कोणत्याही विषयातील संशोधन समाजासाठी उपयुक्त व मार्गदर्शन करणारे ठरावे. संशोधकाचा सकारात्मक दृष्टिकोन हा कोणत्या विषयातील संशोधनाला दिशादर्शक ठरतो व तो समाजाला उपयुक्त ठरतो. असे उद्गार महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी लोटे च्या नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद काळे आणि काढले. बॅ.नाथ पै नर्सिंग महाविद्यालयामध्ये आयोजित तीन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग येथील बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग कॉलेज कुडाळ येथे 21, 22 आणि 23 जानेवारी 2026 रोजी तीन दिवसीय “बेसिक रिसर्च मेथोडोलॉजी “या विषयावर राज्य स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते
या कार्यशाळेमध्ये नर्सिंग क्षेत्रातील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्ती मार्फत प्रशिक्षणार्थींना “बेसिक रिसर्च मेथोडोलॉजी ” या विषया अंतर्गत विविध विषयांवर मार्गदर्शन केले गेले.
डॉ. काळे आपल्या पुढील मनोगतामध्ये म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाची मौलिकता स्पष्ट करताना वैद्यकीय क्षेत्र हे असे क्षेत्र आहे की दररोज नवनवीन ज्ञान त्यामध्ये अपडेट होत असतं आणि त्यामध्ये नवीन नवीन संशोधनांची भर पडत असते. या सर्वांचा विचार करून आपण बेसिक संशोधनाची मूलतत्वे समजून घेतल्यास संशोधन हे फार मौलिक व वैद्यकीय क्षेत्रासाठी प्रेरक व पूरक ठरू शकते. याचे भान ठेवून संशोधन करावे. या दृष्टीने या बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालयातर्फे आयोजित या राज्यस्तरीय संशोधन विषयक कार्यशाळेचा नक्कीच उपयोग होईल. त्यांनी कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेत चाललेल्या या कार्यशाळेत नर्सिंग क्षेत्रातील विविध संशोधने,ती कशी करावीत व त्याचा समाजासाठीचा वापर, अशा अनेक विषयांवर चर्चासत्र व त्या संदर्भात मार्गदर्शन यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी लोटे,नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य / प्रा. मिलिंद काळे , तसेच प्रा. महंतेश कारगी, प्रा. धनंजय डोंगरे, प्रा. शिवप्रसाद हालेमनी,प्रा. दिव्या मोहनन या अनुभवी व्याख्यात्यांचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना लाभले.
या कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध ज़िल्हा्यातील एकूण 40 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. या क्षेत्रातील नर्सिंग प्रशिक्षणार्थी यांना याचा उत्तम लाभ झाला.

error: Content is protected !!