कोकण रेल्वे आणि प्रा.दंडवते यांचे अजोड नाते आहे – प्रा अरुण मर्गज

प्रा. मधू दंडवते यांना जयंती निमित्त अभिवादन

कुडाळ : जेव्हा जेव्हा कोकण विकासात कोकण रेल्वेच्या योगदानाचा विषय येईल, तेव्हा कोकण विकास, कोकण रेल्वे आणि प्रा. मधु दंडवते यांचे नाव दुर्लक्षित करून चालणार नाही. कोकणचा विकास ज्या वेगाने होत आहे त्याला कोकण रेल्वे फार मोठा हातभार लावत आहे. कोकणी माणसांचं कोकण रेल्वेचे स्वप्न प्रा. मधु दंडवते व जॉर्ज फर्नांडिस या जोडीमुळे शक्य झाले आहे. असे प्रतिपादन प्रा.अरुण मार्गज यांनी केले. प्रा. मधु दंडवते यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कुडाळ रेल्वे स्टेशन येथे अभिवादन करताना ते बोलत होते.
विविध रेल्वे स्टेशनमध्ये मधु दंडवते यांच्या प्रतिमेचे अनावरण करून त्यांच्या योगदानाची रेल्वे प्रवाशांना सतत जाणिव करून देण्यासाठी आग्रही असणारे बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मधु दंडवते यांच्या कुडाळ रेल्वे स्थानकातील व सावंतवाडी रेल्वे स्थानकातील प्रतिमेस पुष्पहार घालून बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक व शिक्षक, विद्यार्थ्यांतर्फे अभिवादन करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावेळी त्यांच्या समवेत कुडाळ रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्टर प्रशांत तांबे,कोकण रेल्वेचे एरिया सुपरवायझर व्ही.डी. सामंत, रेल्वे कर्मचारी मनोहर चव्हाण, चेतन गवळी व विद्यार्थी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले
तर सावंतवाडी येथील रेल्वे स्टेशन मास्तर कृष्णकांत परब, संदेश केरकर,मधुकर मातोंडकर(वरिष्ठ वाणिज्य परिवेक्षक), प्रसाद कानडे, संकेत पाटकर, ज्ञानेश्वर तेली, प्रसाद कानडे व नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तर बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व विविध विभागांचे प्राचार्य, प्राध्यापक,शिक्षक, विदयार्थी, रेल्वे प्रवासी यांच्या उपस्थितीमध्ये मधु दंडवते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

error: Content is protected !!