पालकमंत्री नितेश राणे यांचा मनसेला जोरदार धक्का

वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपात

भाजपा प्रवेशाने वैभववाडीतील मनसे ला घरघर

पालकमंत्री नितेश राणेंनी सर्वांचे पक्षात केले स्वागत

 वैभववाडी मनसे अध्यक्ष महेश कदम यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत मनसेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील ओम गणेश बंगला या ठिकाणी हा प्रवेश पार पडला. श्री. कदम यांच्या प्रवेशाने वैभववाडीतील मनसे ला घरघर लागली आहे. मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

प्रवेश करणाऱ्यांमध्ये मनसे कार्यकर्ते संजय चव्हाण, गणेश गुरव, चंदन पाटणे, बबन डकरे, राजेंद्र गुरव, संतोष गुरव, बबन शिंगरे, सुरेश कदम, शांताराम कोलते, अशोक कदम, अरुणा कोलते, अरुण कोलते, अवनी कदम, राजन कदम, अमोल कोलते, वनिता लाड, सुगंधा पोवार, मनीषा मनवे व असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
महेश उर्फ भैय्या कदम हे करुळ गावचे सुपुत्र आहेत. त्यांनी उपसरपंच म्हणून काम केले आहे. गावच्या सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. शिवशंभो संघटनेत कार्याध्यक्ष, वैभववाडी टेम्पो संघटनेत उपाध्यक्ष पदावर त्यांनी काम केले आहे.
यावेळी वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा बँक माजी संचालक दिगंबर पाटील, शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश सावंत, सरपंच नरेंद्र कोलते, बूथ अध्यक्ष दीपक लाड व पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!