रस्त्यावरच्या बांधवांना सन्मानाचे जीवन मिळवून देऊया.…….संदिप परब, संस्थापक अध्यक्ष जीवन आनंद संस्था

“रस्त्यावरचा बांधव – माझा बांधव”
महापसा येथे जीवन आनंद संस्थेतर्फे जनजागृती रॅली
“रस्त्यावरचा बांधव – माझा बांधव”, “म्हापसा शहर – स्वच्छ शहर”, “निराधारांना घर हवे” अशा गगनभेदी घोषणांनी आज म्हापसा शहर दणाणून गेले. रस्त्यावर जीवन जगणाऱ्या निराधार वंचित बांधवांना सन्मानाचे जीवन मिळावे, या उद्देशाने जीवन आनंद संस्था आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, शिक्षक व संस्थेच्या आश्रमातील समक्ष बांधव यांच्या सहभागाने भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
“भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत” असे आपण म्हणतो. मात्र स्वातंत्र्यानंतर ७९ आणि प्रजासत्ताकानंतर ७६ वर्षे उलटूनही आज हजारो बांधव विविध कारणांनी रस्त्यावरचे निराधार जीवन जगत आहेत. ही बाब समाजासमोर असलेले मोठे आव्हान आहे, या बांधवांना आपण माणूस म्हणून सन्मानाचे जीवन मिळवून देऊया…असे प्रतिपादन जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब यांनी रॅलीदरम्यान केले.
ते पुढे म्हणाले की, गेल्या चार वर्षांत जीवन आनंद संस्थेच्या आश्रमाच्या माध्यमातून म्हापसा शहरातील ५५ हून अधिक निराधार, मानसिक व शारीरिक आजारी बांधवांचे पुनर्वसन तसेच कुटुंब पुनर्मिलन करण्यात आले आहे. तरीही अजूनही अनेक निराधार वंचित बांधव मदतीच्या प्रतीक्षेत असून, सर्वांनी एकत्र येऊन त्यांना माणुसकीचे व सन्मानजनक जीवन मिळवून देण्याची गरज आहे.
या रॅलीत श्रीधर काकुलो वाणिज्य व व्यवस्थापन महाविद्यालय, डी एम सी माध्यमिक, कुशे उच्च माध्यमिक, वालावलकर माध्यमिक व विद्या प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयांतील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सारस्वत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.रुपेश कामत यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन केले.
रॅलीच्या यशस्वी संयोजनात सारस्वत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष पाटकर, जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त पूनम बुर्ये, किसन चौरे , संस्थेचे हितचिंतक संदेश बुर्ये, समन्वयक शैलेन्द्र कदम, डिंपल व साहिल सावकार, महेश स्वार, अजित व अपर्णा आवटे, बीना च्युरी, सुरेंद्र शेट्ये,क्रिसतिना कुरियाकोस,गिरीश पावसकर, संस्थेचे कार्यकर्ते प्रसाद आंगणे, सचिन पडते, नरेश आंगणे, सुनील शिंदे,दीप्ती जाधव , प्रांजल आंगणे व विद्या गुरव
उपस्थित होते .





