क्रिडाईतर्फे कोल्हापूरमध्ये ३० पासून १३ वे दालन प्रदर्शन

बांधकाम आणि वास्तू विषयक स्टॉल्स
आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या हस्ते उदघाटन
क्रिडाई कोल्हापूर यांच्या वतीने येत्या 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान कोल्हापूरच्या महासैनिक दरबार हॉल मध्ये भव्य बांधकाम आणि वास्तू विषयक १३ व्या ‘दालन’ प्रदर्शनाच आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाच उदघाटन 30 जानेवारीला सकाळी ११ वाजता कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार आहे. अशी माहिती क्रिडाई कोल्हापूरचे पवन जामदार यांनी दिली. कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
क्रिडाई कोल्हापूर आयोजित वास्तू विषयक प्रदर्शन (दालन २०२६) ची पत्रकार परिषद आज कुडाळ येथे झाली. यावेळी क्रिडाई कोल्हापूरचे पवन जामदार, केतन शहा, शैलेंद्र अलमण, सागर नालंग, सिंधुदुर्गचे क्रिडाई अध्यक्ष गजानन कांदळगावकर, अभिजित जैतापकर, अभय वालावलकर उपस्थित होते.
यावेळी पवन जामदार म्हणाले, क्रिडाई कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांची शिखर संघटना असून क्रिडाई कोल्हापूर तर्फे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य बांधकाम व वास्तू विषयक प्रदर्शन दि. ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीमध्ये महासैनिक दरबार हॉल ग्राऊंड येथे आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचा मंडप उभारणीचे काम महासैनिक दरबार हॉल येथे वेगात चालू असून सदर स्टॉलचा ताबा येत्या २६ जानेवारी २०२६ रोजी देणार आहोत. सदर प्रदर्शन ४ दिवस सकाळी १० ते ८ या कालावधीत चालू राहणार आहे.
सन १९९२ मध्ये बांधकाम विषयक प्रदर्शनाची सुरवात झाली. आताचे हे १३ वे दालन आहे. या दालनचे उद्घाटन शुक्रवार दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता ना. प्रकाश आबिटकर आरोग्य मंत्री, पालकमंत्री कोल्हापूर यांचे शुभ हस्ते, खा. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज व ना. हसन मुश्रीफ वैद्यकिय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आ. राजेश क्षिरसागर, खा. धनंजय महाडीक, आ. अमल महाडीक, आ.चंद्रदिप नरके, आ. सतेज पाटील, माजी खासदार संजय मंडलिक, प्रफुल्ल तावरे अध्यक्ष, क्रिडाई महाराष्ट, विद्यानंद बेडेकर उपाध्यक्ष, क्रिडाई महाराष्ट्र यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
शनिवार दिनांक ३१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता कोल्हापूर व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी “Innovative Solutions for modern-day complex structures” या विषयावर Prof. M. G. Gadgil (B.E.Civil, M.Tech) Mumbai यांचा टेक्निकल सेमिनारचा आयोजित केले असून इंजिनिअर तुषार बुरूड अधिक्षक अभियंत्ता, सार्वजनिक बांधकाम विभाग, इंजि. प्रशांत हडकर चेअरमन असोसिएशन ऑफ् इंडियन सोसायटी स्ट्रक्चरल इंजिनिअर्स, इंजि रमेश मस्कर शहर अभियंत्ता कोल्हार महानगरपालिका यांच्या उपस्थितीत सेमिनार होत आहे रविवार दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता मा. अच्युत गोडबोले सर, केमिकल इंजिनिअर यांचे “AI & Changing World.” या विषयावर टेक्निकल सेमिनार आयोजित केले आहे. तसेच सुप्रसिध्द मराठी सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे दालन ला भेट देऊन संवाद साधणार आहेत.
सोमवार दिनांक ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या शुभहस्ते व कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. व कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांचे उपस्थितीत सांगता समारंभ होणार आहे.
या दालनमध्ये १७० स्टॉल असून सर्व स्टॉलचे बुकिंग झाले आहे. नुकतेच कोल्हापूर सांगली सातारा, सोलापूर, सिधुदूर्ग व रत्नागिरी या सहा जिल्हयासाठी मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ स्थापन झाले आहे. त्यामुळे वकील, पक्षकार व तेथील जनतेचा कोल्हापूरकडे ओघ वाढत आहे. या प्रदर्शनामुळे त्यांना कोल्हापूरात गुंतवणूकीस संधी मिळणार आहे. तसेच कोल्हापूर व परिसरातील ग्राहकांना एकाच छताखाली नवनवीन प्रकल्प, तंत्रज्ञान बांधकाम विषयक साहित्य, अर्थसहाय्य करणा-या बँका यांची माहिती एकाच छताखाली मिळणार असून ग्राहकांचे घराचे स्वप्न प्रत्यक्षात सत्यात उतरणार असून या प्रदर्शनाचा फायदा होणार आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने आम्ही एक स्मरणिका काढणार आहोत.
या प्रदर्शनाचे प्रायोजक पुढील प्रमाणे आहेत – प्लॅटिनम स्पॉन्सर -आर्या स्टील रोलिंग प्रा. लि.
डायमंड स्पॉन्सर- १) इटाका सिरॅमिक्स २) एसकॉन इस्पात प्रेस्टिज एलएलपी
गोल्ड स्पॉन्सर- १) केवेस्ट इन्फ्रा व हायस्ट्रीट डेव्हलपर्स २) अविष्कार इन्फ्रा ३) मोटो टाईल्स ४) स्टेट बँक ऑफ इंडिया ५) यश पॉली ६) स्मिपोलो टाईल्स
सिल्वर स्पॉन्सर १) विन्डो एक्स्पर्ट २) तेजस इंडस्ट्रिज ३) सतिश अॅटेना सोलर सिस्टिम ४) युनियन बँक ऑफ इंडिया ५) एच आर विंडटेक (वेका)
को स्पॉन्सर – १) बेडेकर लाईफस्पेस एलएलपी २) ओम गणेश कन्स्ट्रक्सनस् ३) स्वप्नशिल्प हौसिंग एलएलपी ४) गायकवाड इन्फास्ट्रक्चर ५) घाटगे डेव्हलपमेंट ६) साई डेव्हलपर्स अॅन्ड बिल्डर्स ७) विश्वकर्मा बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स ८) एस. के. डेव्हलपर्स ९) सुरज इस्टेट डेव्हलपर्स १०) कन्स्ट्रो कन्सलटन्स् ११) दी आयडीयल कन्स्ट्रक्शनस् १२) वरद डेव्हलपर्स १३) रायसन्स कन्स्ट्रक्शनस् १४) लक्झेटा रियलटर्स
सेमी को स्पॉन्सर- १) फेराकॉल २) स्मॅश इलेवेटर्स ३) बँक ऑफ इंडिया ४) एनएनआयटी कार पार्किंग सिस्टिम ५) वोक्स इंटेरियर अॅन्ड एक्सटेरियर सोलूशन प्रा. लि. ६) हायड्रा पार्क ७) ग्रेट व्हाईट ग्लोबल ८) पॅरीवेअर रोका ९) लिशा स्विचेस १०) ओटीआएस इलेवेटर्स ११) कोने इलेवेटर्स या प्रायोजकांचे दालन २०२६ साठी सहकार्य लाभले आहे.





