कणकवलीत ठाकरे शिवसेनेला डबल धक्का, जानवली जि. प. मधील ठाकरे सेनेच्या उमेदवाराची माघार

जानवली जि. प. च्या महायुतीच्या शिवसेनेच्या उमेदवार रुहिता तांबे बिनविरोध

बिनविरोधचा “कणकवली पॅटर्न” राज्यात चर्चेत येणार

कणकवली तालुक्यामध्ये भाजपा पाठोपाठ शिंदे शिवसेनेने देखील बिनविरोध निवडीचे खाते उघडले असून कणकवली तालुक्यातील जाणवली जिल्हा परिषद मतदार संघातील महायुती मधील शिंदे शिवसेनेच्या उमेदवार रुहिता तांबे यांच्या विरोधातील हेलन कांबळे या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराने आज माघार घेतल्याने जाणवली जिल्हा परिषद मतदार संघातील शिवसेनेच्या रुहिता तांबे या बिनविरोध झाल्या आहेत. रुहिता तांबे या ओटव गावच्या सरपंच असून खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर यांच्या पाठोपाठ ओटव गावच्या सरपंच रुहिता तांबे या बिनविरोध झाल्याने कणकवली तालुक्यातील दोन सरपंच जिल्हा परिषद उमेदवार म्हणून बिनविरोध झाले आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांचा करिष्मा व महायुती मधील एक कणकवली पॅटर्न आता या निमित्ताने जिल्हा परिषद निवडणुकीस उदयास येताना पाहायला मिळत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांची धुरंदर खेळी ही बहुदा कणकवली मतदार संघात शिवसेनेचा नामोनिशान मिटवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

error: Content is protected !!