यंदाच्या दिल्लीतील प्रजासत्ताक दिनी आजगाव सरपंच विशेष निमंत्रित

पंचायत राज ग्रामविकास मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून दिल्ली कर्तव्य पथ येथील 77 व्या प्रजासत्ताक दिनी मुख्य सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून आजगाव सरपंच सौ यशश्री सौदागर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यातील 16 सरपंचांना हा मान मिळाला असून त्यात यशस्वी सौदागर यांना हा बहुमान मिळाला आहे. या विशेष निमंत्रित सरपंचांसोबत महाराष्ट्र पंचायत राज विभागाचे दोन नोडल अधिकारी असणार आहेत. महाराष्ट्रातील या सर्व विशेष निमंत्रित सरपंचांचे दिनांक 24 जानेवारी ते 26 जानेवारी या दरम्यान नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे वास्तव्य असणार आहे. 25 जानेवारी रोजी सकाळी ते पंतप्रधान संग्रहालय येथे भेट देणार असून सायंकाळी सात वाजता केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाकडील ग्राम सर्वोदय मासिक प्रकाशन सोहळ्यात त्यांची उपस्थिती असेल .त्यानंतर देशपातळीवरील स्पर्धांचा पारितोषिक वितरण कार्यक्रम केंद्रीय पंचायत राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत या सर्व विशेष निमंत्रित सरपंचांच्या सहभागाने होईल. 26 जानेवारी रोजी कर्तव्य पथ दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन मुख्य सोहळ्यात त्यांची उपस्थिती असेल. देशाच्या या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास देशातील निवडक निमंत्रित सरपंचा समवेत यशस्वी सौदागर यांना हा बहुमान मिळाल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.





