तेंडोली गावठणवाडी शाळा भरली भर उन्हात

कोसळलेल्या छपराबाबत पर्यायी व्यवस्था नाही

पालकांचे उन्हात शाळा भरवून आंदोलन

कुडाळ : तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा तेंडोली गावठण या शाळेच्या धोकादायक छप्पराचा भाग शुक्रवारी (९ जानेवारी रोजी) कोसळला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत बसविणे धोकादायक झाले होते. याबाबत पालकांनी कुडाळ पंचायत समिती शिक्षण विभागाचे लक्ष वेधले. त्यावेळी गट शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने शाळेला भेट देऊन पाहणी केली. तसेच शिक्षण विभागामार्फत तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र सोमवारी पर्यायी व्यवस्था न केल्याने आज पालकांनी मुलांना शाळेसमोरील अंगणात बसवून भर उन्हात शाळा भरवत आंदोलन सुरू केले आहे.
शिक्षण विभागाने तात्काळ पर्यायी व्यवस्था तसेच छप्पर दुरूस्ती करण्याची मागणी पालकांनी लावून धरली आहे. यावेळी पालक विष्णू तेंडोलकर, सत्यवान तेंडोलकर, प्रदीप तेंडोलकर, तुकाराम राऊळ निलेश जाधव, तेजस तेंडोलकर, वेदिका तेंडोलकर, परशुराम तेंडोलकर, सुहास तेंडोलकर, अस्मिता तेंडोलकर, अनामिका तेंडोलकर, तसेच माजी सरपंच मंगेश प्रभू, रामचंद्र राऊळ आदींसह पालक उपस्थित होते.

error: Content is protected !!