मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारासाठी शिवसेना उपनेते संजय आंग्रे मैदानात

कांदिवली पूर्व व मालाड पश्चिम येथे महानगरपालिका निवडणूक प्रचारात घरोघरी भेटी
कोकणी मतदारांचा शिवसेनेला उत्स्फूर्त पाठिंबा
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते श्री. संजय आग्रे यांनी कांदिवली पूर्व व मालाड पश्चिम परिसरात प्रचार दौऱ्याची जोरदार सुरुवात केली. वॉर्ड क्र. 32 (कांदिवली पूर्व) व वॉर्ड क्र. 28 (मालाड पश्चिम) या भागांमध्ये त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी व स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधत शिवसेनेची भूमिका मांडली.
या प्रचार दौऱ्यात श्री. संजय आग्रे यांचे शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. परिसरातील नागरी समस्या, विकासकामे, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच तरुण व महिलांशी संबंधित प्रश्नांवर त्यांनी नागरिकांशी चर्चा केली. शिवसेना ही नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करत आली असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला भरघोस पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रचारादरम्यान सोबत शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल, युवराज आग्रे तेथील स्थानिक पदाधिकारी, माजी नगरसेवक, शाखाप्रमुख, महिला आघाडी व युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रचार दौऱ्यामुळे वॉर्ड क्र. 32 व वॉर्ड क्र. 28 मध्ये शिवसेनेच्या प्रचाराला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र यावेळी कार्यकर्त्यांनी अनुभवले.





