कलमठ ग्रामपंचायतचा विधवा महिलांच्या बाबतीत घेतलेला निर्णय हा दिशादाई!

अभिनेता पृथ्वीक प्रताप यांचे प्रतिपादन
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत प्रचार व जनजागृती कार्यक्रम
गावातील नागरिकांचा प्रतिसाद पाहता सरपंच संदीप मेस्त्री यांचे नेतृत्व कणखर
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत प्रचार व जनजागृतीचे काम करत असताना कलमठ गावात आल्यानंतर आपण कुठे चाललो हे कळेनाच. आपण कलमठ गावात आल्यानंतर काही बॅनर पाहिले, ग्रामस्थांना पाहिले असता एक वेगळाच आनंद नागरिकांच्या चेह-यावर दिसुन आला. हे अभियान सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी महत्वपुर्ण ठरत आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिवशी विधवा महिलांसाठी अलंकार न तोडणा-या महिलांची घरपट्टी आणि पाणीपट्टी आयुष्यभरासाठी माफ करण्याचा निर्णय कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन अभिनेता पृथ्वीक प्रताप यांनी केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत प्रचार व जनजागृती कार्यक्रमाच्या निमित्ताने कलमठ मांड येथुन ग्रामपंचायतपर्यंत जनजागृती रॅली अभिनेता पृथ्वीक प्रताप व अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांच्या उपस्थीतीत काढण्यात आली. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी, गावातील ग्रामस्थ, महीला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यानंतर ग्रामपंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जयप्रकाश परब, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सरपंच संदीप मेस्त्री, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर, माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, रामचंद्र शिंदे, सुनिल नाडकर्णी, उपसरपंच दिनेश गोठणकर, महेश लाड, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, स्वप्नील चिंदरकर, नितीन पवार, अनुप वारंग, सचिन खोचरे, नितिन पवार, सुप्रिया मेस्त्री, स्वाती नारकर, श्रेयस चिंदरकर, पप्पु यादव, प्रीती मेस्त्री, गुरु वर्देकर , स्वरूप कोरगावकर, आबा कोरगावकर, माजी सरपंच महेश लाड, तेजस लोकरे, ओंकार मेस्त्री, तनिष्का लोकरे, नजराना शेख, इफद शेख, प्रियाली आचरेकर, श्रीकांत बुचडे, तनोज कळसुलकर, बाबु नारकर, बाळा चिंदरकर, विनिता बुचडे, निसार शेख, महेंद्र कदम, सचिन पेडणेकर, अशोक कदम, पुजा सावंत, मनोज घाडी, निशा नांदगावकर, सागर पवार, विजय चिंदरकर, जयेश मेस्त्री, दिनार लाड, अक्षता करंजेकर, पूजा हुन्नरे, विभावरी कांबळे, सान्वी कुडाळकर, अक्षता लाड, प्राची पवार, शर्मिला चव्हाण, राजश्री शिर्के, सुनीता पाटकर, सुलभा कदम, रत्नावली लाड, शुभांगी सावंत, मंगेश कदम, आरती गुरव, गणेश सावंत, अण्णा सावंत, ज्योती आमदोसकर, अंकिता राणे, नमिता मठकर, रमेश चव्हाण, मनोज घाडी, गौरव तांबे, मोहन तांबे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
अभिनेता पृथ्वीक प्रताप म्हणाले, सरपंच संदीप मेस्त्री यांनी या ग्रामपंचायतमध्ये शासनाच्या सगळ्या योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत, त्याबद्दल कौतुक आहे पण अत्यंत मनाला भावलेली योजना म्हणजे आपण पुरोगामी आहोत, ते जपता आलं तर तो चांगला पुढारी होऊ शकतो. विधवा महीलांसाठी घेतलेला निर्णय खरोखरच दखलपात्र आहे. जलसंवर्धन, महिलांसाठी महिला बचत गट, आदर्श शाळा, डिजिटल सेवा योजना हे सर्व उपक्रम आपल्या गावात आहेत. मुख्यमंत्री पंचायत राज योजना ही आपल्यासारख्या लोकांसाठी बनलेली आहे. जी या गावची लोक आहेत, ती या गावची शक्ती आहे. बक्षीस मिळो ना मिळो आपलं गाव एकोप्याने राहणार आणि आयुष्यभर समृद्ध असणार आहात. माझे वडिल एक वषार्चा असताना निघुन गेले, त्यानंतर माझ्या आईच्या जीवनात अत्यंत खडतर प्रवास मी पाहीलेला आहे. परंतु या गावाने विधवा महीलांसाठी घेतलेला निर्णय मी माझ्या आईला सांगणार आहे.
अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर म्हणाल्या, सरपंच संदीप मेस्त्री यांनी कलमठ गावामध्ये काही नवनवीन गोष्टी राबवलेल्या आहेत. त्या गोष्टी मला मनापासून आवडलेल्या आहेत. मी एक कोकणातली मुलगी म्हणून मला खूप अभिमान वाटतो. कलमठ गावातली सर्व माणसं आणि त्यांना एक उत्तम नेतृत्व आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वजण एकत्र येऊन मनापासून काम करत आहात. त्यामुळे गाव मोठा होतोय आणि गावातली माणसं सुद्धा मोठी होणार आहेत. आणि तुमची पुढची पिढी ही तुमच्याकडून शिकत आहे. तर पुन्हा एकदा मला मनापासून कोकणवासीय असल्याचा खूप अभिमान आहे. आणि मी कलमठ गावात आली आहे, याचा मला खूप अभिमान आहे.
सरपंच संदीप मेस्त्री म्हणाले, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कलमठ गावामध्ये सेलिब्रिटी म्हणून अभिनेता पृथ्वीक प्रताप आणि अभिनेत्री रसिका वेंगुलेकर आले आहेत. आम्ही सहा महिने हे अभियान राबवत आहोत. माज्या ग्रामपंचायत मधील सर्व सहकारी, उपसरपंच, माजी सरपंच आशाताई, अंगणवाडी ताई आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे गावातील सर्व महिला भगिनी मिळुन आॅगस्ट महिन्यामध्ये या अभियानाची सुरुवात झाली. त्याला चांगले यश मिळत असुन तालुक्यात प्रथम क्रमांक आलेला आहे. आमच्या गावातील नागरिकांना सर्व दाखले ग्रामपंचायतमध्ये मिळतात. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ केला होता. आतापर्यंत कलमठ गावातील 400 विद्यार्थ्यांना दाखले वाटप करण्यात आले आहेत. आमच्या गावातील गरजू महिला व किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी पॅड एटीएम मशीन उपलब्ध केली आहे. महिलांना दर महीन्याला पाच सॅनिटरी पॅड मोफत उपलब्ध होतात. आमच्या गावातील शाळा प्रगतशील आहेत. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 14 जणांना एकाच ठिकाणी जमीन खरेदी करुन गृहप्रकल्प साकारला जात आहे. त्यासाठी पंडित दिनदयाळ योजनेतुन जमीन खरेदीसाठी अनुदान मिळालेले आहे. विधवा महीलांसाठी घरपट्टी, पाणीपट्टी माफ करण्याच्या निर्णयाची दखल महीला आयोगाने घेतली आहे. हा उपक्रम राज्यभर लागु करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असणार आहे. या विविध उपक्रमांमध्ये मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, गटविकास अधिकारी रवींद्र चव्हाण यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभले.





