श्री.पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजमध्ये कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ व APTI -MS या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘Herbal extraction and isolation techniques’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली. मुंबई येथील ICT संस्थेचे संशोधक,तज्ञ प्राध्यापक डॉ.किर्ती लड्ढा यांनी या कार्यशाळेला मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत डॉ.लड्ढा यांनी निसर्गात सापडणा-या विविध कच्च्या वनौषधी पदार्थांपासून त्यातील नेमके औषधी घटक वेगळे करण्याच्या प्रचलीत पध्दती सुलभ करुन प्रशिक्षणार्थींना शिकविल्या. ह्या घटकांचे रासायनिक पृथक्करण करण्याच्या पध्दतींचेहि ज्ञान दिले. प्रयोगांसाठी आवश्यक रसायने,उपकरणे तसेच मशींनीचा वापर करण्याच्या सुटसुटीत पद्धती प्रत्यक्ष कृतीतुन शिकविल्या .
या दरम्यानच्या कार्यक्रमात बोलताना डॉ.लड्ढा म्हणाले कि, कार्यशाळेत आपण प्रशिक्षणार्थींना आकलनास सुलभ होतील अशा प्रयोग पद्धती शिकविल्या. मला आशा आहे कि त्यांना त्याचे आकलन झाले असेल. प्रशिक्षणार्थी व एस. पी. एस. फार्मसी कॉलेजच्या कर्मचारीवृंदाने हिरीरिने सहभाग घेतल्याने कार्यशाळा यशस्वी झाली असे ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ.युवराज पांढरे आदि मान्यवर उपस्थित होते. एकुण कार्यक्रमाचे समन्वयक सहाय्यक प्राध्यापक महादेव परब व प्रतिक तेर्से होते.
डॉ. लड्ढा व कार्यक्रमाचे संयोजक प्राचार्य डॉ.पांढरे यांच्या हस्ते २२ प्रशिक्षणार्थींना सहभागाची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
संस्थाध्यक्ष श्री.भुपतसेन सावंत व परिसर संचालिका सौ.नुतन परब यांच्या पुढाकारातून पार पडलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक , सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापक महादेव परब यांनी केले.





