कणकवली कामत सृष्टी परिसरात साचलेल्या गटाराची सुट्टी दिवशी तात्काळ सफाई

शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेबद्दल नागरिकांमधून समाधान
मेघन मुरकर, तेजस राणे यांच्यासह कार्यकर्त्यांचा पुढाकार
कणकवली नगरपंचायत च्या सत्ताधारी कणकवली शहर विकास आघाडी मधून विजयी झाल्यानंतर कणकवली शहरातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये साचलेल्या गटाराची सफाई नगरसेविका जाई मुरकर यांच्या माध्यमातून या प्रभागातील शहर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून करून घेण्यात आली. रविवारी सुट्टी दिवशी देखील हे काम मार्गी लावून घेण्या करिता मेघन मूरकर, तेजस राणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. तात्काळ दखल घेत हे काम मार्गी लावल्याबद्दल या भागातील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. यावेळी मेघन मुरकर, तेजस राणे, सुमित राणे, भिवा परब, सत्यवान राणे, बंडू कलिंगण, मंगेश घाडीगावकर, किशोर उबाळे आदी उपस्थित होते.





