कणकवलीत ‘युवासेना चषक–2026’ नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांची माहिती

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेच्या वतीने ‘युवासेना चषक–2026’ भव्य नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. 17 व 18 जानेवारी 2026 रोजी कणकवली–दारिस्ते, गावकरवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत विजेत्या संघाला ₹7,777/- रोख व भव्य चषक, तर उपविजेत्या संघाला ₹5,555/- रोख व भव्य चषक देण्यात येणार आहे. यासोबतच मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यांना विशेष चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेदरम्यान भव्य लकी ड्रॉ व आकर्षक बक्षिसांचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागासाठी इच्छुक संघांनी वेळेत नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. सर्व सामने हँडलॉक पद्धतीने खेळवण्यात येणार असून पंचांचा निर्णय अंतिम राहील. खेळाडूंना दुखापत झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही, तसेच उर्वरित नियम मैदानावर जाहीर करण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी
महादेव गावकर – 8975897315,
प्रतीक गावकर – 8275262431,
सुजल गावकर – 9307082230
यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळवले आहे.

error: Content is protected !!