कणकवली शिक्षण संस्था सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मारुती पुजारी

उपाध्यक्षपदी सुहास मुसळे यांची बिनविरोध निवड
कणकवली शिक्षण संस्था सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित कणकवलीच्या 2025 – 2030 या कालावधीकरिता संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. सोमवार दि.29/12/2025 सकारात्मक दिवसाचे औचित्य साधून अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी बैठक झाली. यावेळी नवनियुक्त संचालक एम. एच. पुजारी, एस. डी. बांगर , पी. ए. वळवी, वाय. व्ही. दळवी, आय. पी. केंद्रे, ए. ए. जगदाळे , व्ही. आर. घोरपडे, एस. एम. पवार , व्ही. एस. सातपुते, पी. जे. पाटील, आर. आर. डोईफोडे, एस. डी. गायकवाड, एस. व्ही. सोनुर्लेकर, जी. ए. कदम, एस. बी. मुसळे हे उपस्थित होते. सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीम. सुनिता भोगले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेमध्ये नवनियुक्त संचालक मंडळातून मारुती हालाप्पा पुजारी यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी सुहास भास्कर मुसळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच संचालक गणेश कदम यांची पतसंस्थेच्या सचिव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीनंतर सर्व संचालकांमार्फत नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे निवडणूक अधिकारी सुनिता भोगले यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी निवडणुक अधिकारी यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये केलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करत नवीन नेतृत्वाकडून पुढील कार्यभार पारदर्शक व सभासद हिताच्या दृष्टीने कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. यानंतर नवनियुक्त अध्यक्ष यांनी आपल्यावर सर्व संचालकानी विश्वास दाखवून आपली पतसंस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली याबद्दल धन्यवाद व्यक्त करून पतसंस्थेच्या प्रगतीसाठी सतत कार्यरत राहून सर्वांचा विश्वास सार्थकी लावेन असे मनोगत व्यक्त केले.





