पश्चिम विभागीय टेनिस स्पर्धा निर्णायक टप्प्यात पुरुष व महिला संघ अखिल भारतीय स्पर्धेस पात्र

असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (AIU) यांच्या मान्यतेखाली संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर येथे आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय टेनिस स्पर्धा आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. ७ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या या स्पर्धेत विविध राज्यांतील विद्यापीठांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

पुरुष गटात, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मणिपाल विद्यापीठ जयपूर आणि आयटीएम ग्वालियर या चार संघांनी अखिल भारतीय स्पर्धेस पात्रता मिळवली.तसेच महिला गटातील लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ग्वालियर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ आणि गोविंद गुरु ट्रायबल युनिव्हर्सिटी बांसवाडा संघ अखिल भारतीय महिला टेनिस स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. पुरुष व महिला संघांची अंतिम क्रमवारी उद्या होणाऱ्या निर्णायक सामन्यांनंतर निश्चित होणार आहे. हे संघ १७ ते २१ जानेवारी २०२६ दरम्यान मणिपाल विद्यापीठ जयपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय पुरुष आणि महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार आहेत. महिला संघांचे सामने संजय घोडावत विद्यापीठाच्या कॅम्पसमधील टेनिस कोर्टवर, तर पुरुष संघांचे सामने कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन (KDLTA), कोल्हापूर येथे पार पडत आहेत. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व आवश्यक क्रीडा सुविधा, पंच व्यवस्था व आयोजन व्यवस्थापन प्रभावीपणे राबविण्यात आले आहेत. या वर्षीच्या पश्चिम विभागीय स्पर्धेत विविध विद्यापीठांचे प्रतिभावंत खेळाडू सहभागी झाले असून, अखिल भारतीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरीसाठी तयारी सुरू आहे.

error: Content is protected !!