कणकवली मधील नरडवे प्रकल्पग्रस्त प्रकाश सावंत यांच्या आत्महत्या करण्याच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची शासनाकडून गांभीर्याने दखल

पालकमंत्री नितेश राणे यांची एक्स पोस्टद्वारे माहिती
कणकवलीमधील नरडवे येथील पाटबंधारे प्रकल्पग्रस्त प्रकाश सावंत यांनी काल मुंबई उच्च न्यायालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना धक्कादायक आहे. या घटनेची शासनस्तरावर गंभीर दखल घेण्यात आली असून सदर प्रकरणी श्री. सावंत यांना कायद्याच्या चौकटीत राहून आवश्यक ती योग्य मदत उपलब्ध करून देण्यात येईल.
या अनुषंगाने आज त्यांच्या बंधूंशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून घटनेबाबतची सविस्तर माहिती जाणून घेतली. अशी माहिती एक्स पोस्ट द्वारे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.





