निगुडे नं. १ शाळेला नम्रता राणे यांचेकडून खेळासाठी ड्रेस प्रदान

         निगुडे गावातील मुंबई स्थित सौ. नम्रता राणे यांच्याकडून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा निगुडे नंबर एक शाळेतील 51 मुलांना शारीरिक शिक्षण तसेच क्रीडा स्पर्धेसाठी उपयुक्त असे सुमारे तीस हजार रुपये किमतीचे पिटी ड्रेस उपलब्ध करून दिले. यासाठी शाळा समितीचे अध्यक्ष श्री. महेश गावडे, श्री. संतोष राणे यांनी विशेष प्रयत्न केले.
           सौ. नम्रता राणे मुंबई स्थित असून सुद्धा गावातील विविध सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी सर्व मुलांची गरज ओळखून पिटी ड्रेस उपलब्ध करून दिले. या ड्रेस वितरणप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. महेश गावडे, व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. संतोष राणे, श्री. शामराव म्हाडगूत, श्रीम. भाग्यश्री जाधव, श्रीम. रंजना सावंत, श्रीम. संजना केसरकर तसेच सौ. राणे यांचा चिरंजीव कु. ओम राणे व सासरे श्री. नारायण राणे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. नारायण नाईक, शिक्षिका श्रीम. प्रांजल देसाई आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!