विद्यार्थ्यांनी हार जीत पर्वा न करता खिलाडू वृत्तीने खेळून आपले नैपुण्य दाखवावे – संस्थाध्यक्ष हनुमंत प्रभू

विद्यार्थ्यांनी हार जीत पर्वा न करता खिलाडूवृत्तीने खेळून आपले नैपुण्य दाखविण्याचे आवाहन ज्ञानदीप संस्था वायंगणीचे अध्यक्ष हनुमंत प्रभू यांनी ज्ञानदीप हायस्कूल वायंगणी येथे केले.

ज्ञानदीप हायस्कूल वायंगणी च्या क्रिडामोहोत्सवाला संस्था अध्यक्ष हनुमंत प्रभू यांचे हस्ते मशाल प्रज्वलीतकरून व श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक टकले सर, श्रीमती बावकर, जाधव सर, वसावे सर, आडेसर, कुणकवळेकर मॅडम, शिंदे मॅडम, कर्मचारीवर्ग, मुले व ग्रामस्थ आदी उपस्थित होते. या वेळी संस्थाध्यक्ष श्री. प्रभु यांनी मुलाना तीन दिवस चालणार्या या क्रीडा स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या होणाऱ्या क्रिडास्पर्धेत एकुण बेचाळीस बक्षिसे देण्यात येणार आहेत ती बक्षिसे आपल्या मार्फत दिली जातील असे जाहीर केले. क्रिडा स्पर्धेची सुरवात मशाल व ध्वज फिरवून संचलन करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जाधव सर यांनी केले तर आभार श्रीमती बावकर यांनी मानले.

error: Content is protected !!