जेष्ठांमध्ये नवी उमेद घडविणारा उपक्रम – लक्ष्मण आचरेकर

जेष्ठ नागरीकांसाठी योग प्रक्षिशण वर्गाचा शुभारंभ

व्याधी, दुखणे या विवंचनेत न अडकता आपले स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी योगा शिवाय पर्याय नाही. यासाठी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी यांनी सुरु केलेला योग प्रशिक्षणाचा उपक्रम स्तुत्य असून जेष्ठांमध्ये नवी उमेद घडविणारा असल्याचे मत जेष्ठ मार्गदर्शक लक्ष्मण आचरेकर यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.
जेष्ठ नागरीकांचे स्वास्थ्य उत्तम राहावे, काही क्षण आनंदात जावेत, वयोवृद्ध परत्वे आलेल्या दुखण्यावर मात करण्याची शक्ती निर्माण व्हावी या उद्देशाने जेष्ठ नागरिक सेवा संघ आचरा पंचक्रोशीचे अध्यक्ष आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ योग प्रशिक्षण पदविका प्राप्त अशोक कांबळी यांनी आपल्या घराच्या अंगणात पहिल्या टप्प्यात चार दिवसांचे जेष्ठ नागरिकांसाठी मोफत योग प्रक्षिशण वर्ग सुरु केले. त्याचा शुभारंभ जेष्ठ मार्गदर्शक लक्ष्मणराव आचरेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी, सुरेश ठाकूर, सौ. अरुंद्धती कांबळी, जे एम फर्नांडिस, सुरेश गांवकर, श्रीमती फाटक मॅडम, सौ. खेडकर मॅडम यांसह अन्य जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना अशोक कांबळी यांनी चार दिवसाचे सत्र सुरु करण्यात आले आहे. वर्षभर अशी पंधरा सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. यात किमान दहा दिवस सहभागी होणा-यांना जेष्ठ नागरिक सेवा संघातर्फे सहभागी प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे सांगितले. या प्रशिक्षण वर्गाला जेष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

error: Content is protected !!