कवी अजय कांडर यांच्या व्याख्यानाने गांधी विचार व्याख्यानमालेचा प्रारंभ

८ रोजी राजापूर – ओणी येथे ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ व्याख्यान

नूतन विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय राजापूर ओणीतर्फे गांधी विचार व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचा शुभारंभ सोमवार ८ डिसेंबर रोजी स.१०.३० वा. सुप्रसिद्ध कवी आणि स्तंभ लेखक अजय कांडर यांच्या 'अजूनही जिवंत आहे गांधी' या व्याख्यानाने होणार आहे.
  राजापूर - ओणी नूतन विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे गांधीतीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगिता अभियान राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत मनाची स्वच्छता ही खरी स्वच्छता हा विचार केंद्रस्थानी ठेवून ८ ते ११ डिसेंबर या कालावधीमध्ये गांधी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचा प्रारंभ ८ डिसेंबर रोजी कवी अजय कांडर यांच्या व्याख्यानाने होणार असून ९ डिसेंबर रोजी प्रा. पी. डी. पाटील यांचे गांधी का मरत नाही, १० डिसेंबर रोजी बाबासाहेब नादाफ यांचे मजबुती का नाम गांधी आणि ११ डिसेंबर रोजी डॉ.आनंद मेणसे यांचे गांधी आणि भारताचा स्वतंत्र लढा आदी विषयावर व्याख्याने आयोजित करण्यात आली.
error: Content is protected !!