“आविष्कार 2025” मध्ये खारेपाटण महाविद्यालयाच्या विदयार्थ्याचे घवघवीत यश – C2 कॅटेगरीत प्रथम क्रमांक प्राप्त

आविष्कार 2025” मध्ये खारेपाटण महाविद्यालयाच्या विदयार्थ्याचे घवघवीत यश – C2 कॅटेगरीत प्रथम क्रमांक प्राप्त
सिंधुदुर्ग झोन 9 अंतर्गत आयोजित “आविष्कार रिसर्च कन्व्हेन्शन 2025-26” मध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खारेपाटण यांनी C2 कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावून उल्लेखनीय यशाची नोंद केली. या यशामुळे महाविद्यालयाचे “युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई” साठी निवड (Selection) होऊन महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील कामगिरीला मोठी प्रतिष्ठा लाभली. या स्पर्धेत प्रथम वर्ष वाणिज्य शाखेची कु. रूतिक दत्तगुरु बाईत आणि द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेची कु. तेजश्री सुहास शेंगाळे यांनी सहभाग घेतला. विद्यार्थिनींचे संशोधन मार्गदर्शन व प्रकल्पाचे समन्वयन आविष्कार समन्वयक म्हणून प्रा. माधवी विजय पांचाळ यांनी आपली भूमिका काटेकोरपणे पार पाडली. या सर्वांच्या परिश्रमांना अभूतपूर्व यश मिळाले. या वर्षीच्या आविष्कारचा विषय होता —“स्पूर्ती : विस्मरणात गेलेल्या खेळांची पुनर्भेट”या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी पारंपरिक ग्रामीण खेळांचे सांस्कृतिक, मानसिक आणि शारीरिक महत्त्व संशोधनाधारित पद्धतीने मांडले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कांबळे यांनी विद्यार्थिनींच्या अभिनव कल्पना, सादरीकरण आणि समाजोपयोगी दृष्टिकोनाचे प्रचंड कौतुक केले. खा. पं. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्य तसेच महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मंडळींनी या विजयी कामगिरीचा आनंदाने गौरव केला. मुंबई विद्यापीठाच्या स्तरावर स्पर्धा करण्याची संधी मिळाल्याने खारेपाटण महाविद्यालय आता राज्यस्तरीय पातळीवर आपली छाप उमटविण्यास सज्ज आहे.

error: Content is protected !!