खारेपाटण किल्ला येथे साफसफाई मोहीम संपन्न मावळे आम्ही स्वराज्याचे वैभववाडी विभाग यांच्यामार्फत यशस्वी कामगिरी…..

मावळे आम्ही स्वराज्याचे वैभववाडी विभाग खारेपाटण किल्ल्यावर दिवाळी पासून सतत अनेक मोहिमा राबवत आहे. ह्या मोहिमा अंतर्गत किल्ल्यावर असलेली झाडे झुडपे ज्याच्या मुळे तटबंदीचे नुकसान होऊ शकत अश्या अनावश्यक झाडांझूडपा पासून किल्ल्याला मुक्त करण्यात आले. तसेच ह्या आधी फक्त दिंडी दरवाजा शिवाय किल्ल्या समजत नव्हता परंतु वैभववाडी विभागातील दुर्गसेवक / सेविकांनी मिळून पूर्ण किल्ला लोकांच्या निदर्शनास येईल अश्या स्थितीत आणला. दिनांक ७/१२/२०२५ रोजी खारेपाटण किल्ल्यावर स्वच्छता मोहीम करून यशस्वी रित्या काम पूर्ण करण्यात आले.
ह्या मोहिमा अंतर्गत किल्ल्याची पूर्व बाजू कडील दिंडी दरवाजा, त्यालगत तटबंदी, भुयारी मार्ग, दक्षिण बाजू कडील बुरुज, तसेच पश्चिम बुरुज, पश्चिम तटबंदी स्वच्छ करण्यात आली.
अनेक जण ह्या मोहिमेत सहभागी झाले होते त्याचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद देण्यात आले. यश राऊत, साहिल गुरव (olly), जय उन्हाळकर, कुलदीपक राऊत, सिद्धी राऊत, सुमेधा तावडे, अक्षय तेली, सुरज पाटील, विनय आडविलकर, सार्थक जाधव, श्रेयस बाविलकर, राज तेली, प्रथम चव्हाण, दिनेश माने, वैभव भिसे, युवराज खांडेकर यांनी किल्ल्याला नवसंजीवनी देण्यासाठी या स्वच्छता मोहिमेत कार्यरत होते.





