अणाव येथे लोकसभागातुन बंधारे सप्ताहाला सुरुवात

कुडाळ पंचायत समिती, ग्रामसेवक-सरपंच संघ यांचा उपक्रम
२७ नोव्हेंबरला होणार सप्ताहाची सांगता : १ हजार बंधाऱ्यांचे उद्दिष्ट
कोणताही शासकीय निधी उपलब्ध नसताना कुडाळ पंचायत समितीच्या पुढाकारातून निव्वळ लोकसहभाग आणि श्रमदानातून वनराई आणि कच्चे बंधारे बांधकामाच्या सप्ताहाला आज अणाव-घाटचेपेड येथे सुरुवात झाली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत अणाव ग्रामपंचायत, अणाव ग्रामस्थ , पंचायत समिती कुडाळ, सरपंच सघटना कुडाळ, ग्रामपंचायत अधिकारी संघटना कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा शुभारंभ कार्यक्रम झाला. येत्या २७ नोव्हेंबर रोजी या वनराई बंधारा कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
अणाव घाटचेपेड इथे या वनराई / कच्चे बंधारे कार्यक्रमाचा शुभारंभ आज मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. शुभारंभ कार्यक्रमावेळी शेतकऱ्यांना भाजीपाला मिनीकिटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम शितल पुंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी( ग्रापं) जि प सिंधुदुर्ग जयप्रकाश परब, पंचायत समिती कुडाळ गट विकास अधिकरी प्रफुल्त वालावलकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष राजन परब, रानबांबुळी ग्रापं सरपंच परशुराम परब, माजी पं स सदस्य अरविंद परब, पंचायत समिती उपविभागीय जलसंधारण अधिकारी श्री मोहीते , जलसंधारण अधिकारी श्री सुरवसे, कुडाळ विस्तार अधिकारी (ग्राप) संजय ओरोसकर, विस्तार अधिकारी (ग्रापं)श्री धर्णे, कृषि विस्तार अधिकारी श्री महादेव खरात, कृषि विस्तार अधिकारी श्रीम सोनीया पालव, माजी गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब, संजय गोसावी, तालुका कुडाळ ग्रामपंचायत संघटनेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत अणाव ग्रापं अधिकारी प्रदीप नारकर, ग्रामपंचायत अधिकारी संघटना सचिव सतिश साळगावकर, तालुका संघटना उपाध्यक्ष भीमराव घुगे, जिल्हा सरचिटणीस ग्रापं अधिकारी संघटना संतोष पालव, प्रसिद्धी प्रमुख जिल्हा संघटना ग्राप अधिकारी अनिल चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष अणाव विनायक अणावकर, माजी पंस सदस्य श्रीम उर्मिला अणावकर, उपसरपंच श्रीम आदिती अणावकर, सरपंच लिलाधर अणावकर, अणाव सीआरपी श्रीम सारिका अणावकर, ज्येष्ठ ग्रामस्थ श्री नरे सर, माजी सरपंच नारायण उर्फ आप्पा मांजरेकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष विकास अणावकर, अमोल पालव, गोपाळ पालव, दिलीप पालव, धाकू जाधव, बबली भिकाजी जाधव, सुरेश पवार, तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू, सर्व ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी अणाव, अणाव ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीम पुंड म्हणाल्या, सर्वांना घेऊन ग्राप जलसंवर्धनचे काम करत आहे ही स्तुत्य बाब आहे. तसेच पावसाळा झाल्यानंतर भाजीपाला व इतर पिक घेण्याच्या दृष्टीने पाणी साठवण करणे खूप गरजेचे आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत हा उपक्रम ग्राप अणाव राबवत आहे त्याचे या निमिताने मी कौतुक करते. माझ्या विभागाचे सहकार्य लागेल त्यावेळी मी तयार आहे असे सांगून त्यांनी उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
जयप्रकाश परब यांनी सांगितले, कोकणात पाऊस मोठया प्रमाणात पडतो. परंतू भौगोलिक दृष्ट्या पाणी घाटमाथा प्रमाणे साठवता येत नाही. तरी छोटे छोटे बंधारे घालून पाण्याची वॉटर लेवल शेतकऱ्यांनी वाढवावी व भाजीपाला सारखे पिक घ्यावे. याकरिता ग्रापने केलेला उपक्रम स्तृत्य आहे. गटविकास अधिकारी कुडाळ प्रफुल वालावलकर म्हणाले, बंधारे घालण्याचा उपक्रम यंदा तातुक्यात एक हजार पेक्षा जास्त उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. जलसंवर्धन व जलसंधारणा साठी या तालुक्यात बंधाऱ्यामुळे पाणीटंचाई तालुक्यात भासत नाही. गुरांना पिण्यासाठी, शेतकऱ्यांना शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्याची पातळी वाढते. ग्रापं अणावने राबवलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
मान्यवराचे स्वागत सरपंच लिलाधर अणावकर, उपसरपंच श्रीम आदिती अणावकर, विनायक अणावकर यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी अणाव प्रदीप नारकर यांनी तर आभार प्रदर्शन बाळकृष्ण परब यांनी केले.





