माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या उपस्थितीत प्रभाग क्र.17 चे उमेदवार अबिद नाईक यांचा डोअर टु डोअर झंझावती प्रचार

मतदारांकडून अबिद नाईक यांना उत्स्फूर्त प्रतिसाद.
कणकवली/प्रतिनिधी कणकवली नगरपंचायत निवडणूक 2025 ची रणधुमाळी रंगात आली असून राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक हे प्रभाग क्रमांक 17 मधून राष्ट्रवादी–भाजपा युतीचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रभावी पद्धतीने जनसंपर्क करत आहेत.नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे,सर्वसामान्यांसाठी सदैव उपलब्ध राहणारे असे प्रतिमा असलेले अबिद नाईक यांचा प्रचार वेग पकडत असून त्यांना उल्लेखनीय असा प्रतिसाद मिळत आहे.आज त्यांच्या प्रचार मोहिमेला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत,माजी नगरसेवक बाबू गायकवाड तसेच भाजपा कार्यकर्ते गजा देसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभली.त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभागात डोअर-टू-डोअर ‘झंझावती’ प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले.प्रत्येक घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या,अपेक्षा, विकासाच्या गरजा जाणून घेण्याचा प्रयत्न या दौऱ्यात करण्यात आला.प्रचारादरम्यान स्थानिक मतदारांनी अबिद नाईक यांचे मनपूर्वक स्वागत करत त्यांच्यावरील विश्वास अधिक दृढ करत,उत्स्फूर्त अशा प्रतिसादाने वातावरण भारावून टाकले.अबिद नाईक यांच्या प्रामाणिक कार्यशैली,सर्वसमावेशक विकासाची भूमिका आणि जनतेशी असलेली निगडितता यामुळे प्रभागात सकारात्मक लाट निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
कणकवली नगरपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम,प्रामाणिक आणि दूरदृष्टी असलेल्या उमेदवाराच्या रूपाने अबिद नाईक हे मतदारांच्या अपेक्षांना योग्य न्याय देतील,असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे.प्रभाग क्रमांक 17 मध्ये निवडणूक चुरशीची असली तरी नाईक यांच्या प्रचाराला मिळणारा जनसमर्थनाचा ओघ त्यांच्या बाजूने जोरदार वातावरण तयार करत आहे.
भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत,माजी नगरसेवक बाबू गायकवाड,भाजपा कार्यकर्ते गजा देसाई,भाजपा कार्यकर्ते राज नलावडे,राष्ट्रवादी शहराध्यक्ष इम्रान शेख,भाजपा माजी महिला शहराध्यक्ष संजीवनी पवार,युवक जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर,जिल्हा प्रतिनिधी सचिन सरांगले,शहर उपाध्यक्ष गणेश चौगले,इक्रा नाईक,रिझा नाईक,अली नाईक,भाजपा भूथ अध्यक्ष प्रज्ञेश उर्फ सोनू निग्रे,अच्युत घाडीगावकर महाराज,रनागेश चव्हाण,निलेश पेडणेकर,तेजस येरम,समर्थ चव्हाण,रेणुका चव्हाण,निखिल बोभाटे,गणेश नेर्सेकर,संकेत पाटील,साहिल परब,सागर पाटील,समर्थ गडकरी,सोहंम वडवलकर,कुलदीप मॉर्ये,साक्षी तरपे,प्रशुमा हळवे,स्नेहा हळवे,पार्थ गायकवाड,सतीश पाताडे सुवर्णा चव्हाण आदी महिला कार्यकर्त्या तसेच राष्ट्रवादी भाजपा युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





