ऑनलाइन सोबत नगरपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाइन देखील नामनिर्देशन पत्र स्वीकारणार

रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचे आदेश

राज्य निवडणूक आयोगाकडून इच्छुक उमेदवारांना दिलासा

ऑनलाइन साईट मध्ये अडचणी येत असल्याने निर्णय

राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम दि.४/११/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्रे संगणकप्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येत आहेत. मात्र आता ऑनलाइन सोबत ऑफलाइन देखील नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करता येणार आहेत . राज्य निवडणूक आयोगाने तसे निर्देश संबंधित जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत. संगणक प्रणालीद्वारे स्विकारण्यात येणाऱ्या नामनिर्देशन पत्राध्ये अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याकरिता शेवटचे दोन दिवस शिल्लक राहीले आहेत. अशा परिस्थितीत संगणकप्रणालीवर भार येण्याची शक्यता लक्षात घेता आणि उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून राज्य निवडणूक आयोगाने या सूचना दिल्या आहेत.
१५/११/२०२५ ते १७/११/२०२५ या कालावधीमध्ये (तीनही दिवस), (रविवार दि.१६/११/२०२५ या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील) दररोज सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजे पर्यंत उमेदवारांना दोन्ही पध्दतीने म्हणजेच संकेतस्थळावर (online) तसेच पारंपारिक (offline) पध्दतीने सुध्दा आपले नामनिर्देशनपत्रे आयश्यक कागदपत्रांसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करता येतील. या निर्णयामुळे इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

दिगंबर वालावलकर/कणकवली

error: Content is protected !!