कुडाळ इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बालदिनाचा उत्साह

कुडाळ : येथील क.म.शि. प्र. मंडळाची इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा कुडाळ येथे बालदिनाने शाळा बहरली, नृत्य वेशभूषा व आनंदाने सजली. क.म.शि. प्र. मंडळाची इंग्रजी माध्यमिक प्राथमिक शाळा, कुडाळ येथे बाल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस प्रशालेच्या मुख्याध्यापिका मुमताज शेख यांनी पुष्पहार अर्पण केला. शाळेची आकर्षक सजावट आणि रांगोळ्यांनी शाळेचा परिसर अधिकच सुंदर दिसत होता. विद्यार्थ्यांनी चाचा नेहरूंचा गौरव करणारी भाषणे सादर केली. त्याचप्रमाणे बालदिनाच्या शुभेच्छा देणारी भाषणे देखील सादर केली. काही विद्यार्थ्यांनी नेहरूंची वेशभूषा करीत विशेष अभिनय सादर केला. यामध्ये मयंक चव्हाण, निरव वसावे , ओकार सावंत , श्रीयश गावडे , हर्ष जावकर स्वरूप मार्गी, दक्ष सावंत , आयोग सावंत, देवयानी साहू यांनी पंडित नेहरूंची वेशभूषा सादर केली. तसेच काही विद्यार्थ्यांनी विविध नृत्य प्रकारांचे सादरीकरण करून वातावरण आनंदमय केले. पूर्व प्राथमिक विभागातील लहान मुलांनी पोलीस, विविध भाज्या, विविध फळे, विविध प्राणी यांच्या वेशभूषा केल्या. तसेच इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी समाज सुधारक, देवी -देवता , महाराष्ट्रीयन स्त्री , कोळीणबाय, महिला क्रिकेटर अशा विविध वेशभूषांमधून प्रेरणादायी सादरीकरण केले.
बालदिनाच्या निमित्ताने चित्त वेधक चित्रे ,शुभेच्छापत्रे आणि हस्तकला व वस्तूंचे सुंदर प्रदर्शन भरवण्यात आले. मुलांसाठी मजेदार खेळांचे आयोजनही करण्यात आले. ज्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना बाल दिनाचा मनमुराद आनंद लुटता आला. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून प्रशालेच्या मुख्याध्यापिका मुमताज शेख उपस्थित होत्या. बालदिन सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान लाभले.

error: Content is protected !!