नगराध्यक्ष पदाकरता समीर नलावडेंसह एकूण 10 उमेदवारी अर्ज भाजपकडून आज दाखल करणार

भाजपाच्या पहिल्या यादीतील नावे काही वेळेतच स्पष्ट होणार

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपा कडून प्रचारासह उमेदवारी अर्ज दाखल करण्यात देखील आघाडी

कणकवली नगरपंचायत निवडणुकीकरिता नगराध्यक्ष पदा साठी भाजपकडून समीर नलावडे यांचे नाव निश्चित झाल्या नंतर नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांच्या सहित कणकवली शहरातील पहिल्या यादीतील नगरसेवक पदाकरता चे 9 उमेदवार आज नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत. कणकवली नगराध्यक्ष पदाकरिता समीर नलावडे हे सलग दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करत असून भाजपाकडून उमेदवारांची नावे निश्चित झाल्यानंतर ती यादी अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार एकूण 9 नगरसेवक पदाकरिता उमेदवारी अर्ज आज दाखल केली जाण्याची शक्यता आहे. तर नगराध्यक्ष पदाकरिता 1 असे मिळून भाजपाकडून आज एकूण 10 उमेदवारी अर्ज दाखल केले जाऊ शकतात. मात्र महायुतीची चर्चा अद्याप सुरूच असल्याने अखेरच्या क्षणापर्यंत यातील काही एकूण उमेदवारांच्या संख्येतील पहिल्या दिवशीची संख्या कमी _ जास्त होऊ शकते. या निवडणुकीत कडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. कारण एकीकडे महायुती तुटल्याचे अद्याप जाहीर झाले नसले तरी स्वबळाच्या दिशेने भाजपाची वाटचाल सुरू आहे. तर शिंदे यांची शिवसेना देखील अजून पर्यंत जाहीर भूमिका घेत नसल्याने भाजपाकडून या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करत पहिले पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. शक्ती प्रदर्शन न करता भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी एकत्र येण्याचे आवाहन समीर नलावडे यांनी केले आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!