कुरंगवणे खैराटवाडी जि. प. शाळेत माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

कणकवली तालुक्यातील कुरंगवणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरंगवणे खैराटवाडी या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच शाळेतील सभागृहात गावचे सरपंच श्री. संतोष उर्फ पप्पू ब्रम्हदंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कुरंगवणे खैराट जि. प. शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री बाबू नारायण गोठणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय कोकाटे, उपसरपंच श्री. बाबला गोसावी, ग्रामपंचायत सदस्य श्रीम. स्नेहा गोसावी, सारिका कुडाळकर, पोलिस पाटील श्री. देवेन गोसावी, कुरंगवणे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री. महावीर गोसावी, श्री. पांडुरंग गोठणकर, नयन धालवलकर, सदाशिव कुडाळकर, संतोष मांडवकर, दीपक पाष्ठे, विश्वनाथ गोसावी, दीपक भितम मुंबई येथील रहिवासी असलेले शाळेचे माजी विद्यार्थी श्री. नारायण कुडाळकर, नारायण रामाने, चेतन भितम, स्वप्नील मांडवकर, मारुती पाष्टये, अंगणवाडी सेविका श्रीम. आशा लडगे तसेच गावातील इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या गावातील शाळा स्वच्छ सुंदर आणि भौतिक सोयी सुविधानयुक्त असायला हवी. तर या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना पुढे येऊन त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचे ऋण फेडण्याची हीच योग्य वेळ असल्याचे भावपूर्ण उदगार कुरंगवणे सरपंच श्री. संतोष उर्फ पप्पू ब्रम्हदंडे यांनी शाळेच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात मार्गदर्शन करताना काढले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती तसेच शाळेच्या शिक्षकांनी तथा पालकांनी मोलाचं सहकार्य केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत सोहळा गीत सादर करून उपस्थितांची मनं जिंकली, त्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले, यानंतर सदर शाळेच्या माजी विद्यार्थी संघाची कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये सर्वानुमते श्री. तानाजी कुडाळकर (अध्यक्ष), विश्वनाथ गोसावी (उपाध्यक्ष), श्रीपाद बागडी (सचीव), प्रवीण कुडाळकर (सहसचिव), संतोष मांडवकर (कोषाध्यक्ष), आणि तुकाराम गोसावी, नारायण रामाणे, दिपक भितम, मारुती गोठणकर, दिपक सोमा गोसावी, चेतन भितम व इतर दोघांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. शाळेचा भौतिक तथा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सर्व शिक्षक व पालक वर्ग, शाळा व्यवस्थापन समिती आणि माजी विद्यार्थी संघ कायम प्रयत्नशील असणार आहे. सरते शेवटी उपस्थित मान्यवर, बहुसंख्येने उपस्थित राहीलेल्या आजी माजी विद्यार्थी, तसेच पालक वर्गाचे आभार मानून आणि “स्नेह भोजन” आटोपून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्तविक शाळेचे मुख्याध्यापक श्रीपाद बागडी सर यांनी केले.तर आभार शाळेच्या उप शिक्षिका श्रीम. शारदा तांदळे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे पदवीधर शिक्षक श्री. गोविंद बावदाणे, उपशिक्षक श्री. राजू गर्जे यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!