कुडाळ देशकर प्रीमियर लीग मध्ये यश मिळवलेल्या कणकवलीतील स्पर्धकांचा समाजातर्फे सत्कार

यापुढे देखील असेच नेत्र दीपक यश मिळवा, ज्येष्ठांकडून पाठीवर कौतुकाची थाप
कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या १० व्या कुडाळदेशकर प्रीमियर लीगमध्ये विविध खेळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांचा हृद्य सत्कार ज्ञातीतील ज्येष्ठांकडून करण्यात आला.
कणकवलीमधील नामवंत व्यापारी काका प्रभू यांची नात कु. हर्षदा प्रभू ही महिलांच्या संपूर्ण साखळी क्रिकेट स्पर्धेत सामनावीर म्हणून निवडली गेली. तीचा सत्कार तिच्या निवासस्थानी करण्यात आला. क्रिकेट संघाना प्रशिक्षण देणाऱ्या श्री. सुनील तेंडुलकर यांचाही सत्कार करण्यात आला.
बुद्धिबळ स्पर्धेत साखळीचे सर्व सामने जिंकून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या कु. मनाली देसाई हिचा सुद्धा सत्कार यावेळी करण्यात आला. कु. मनाली ही कणकवलीतील ख्यातनाम व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रसन्ना देसाई यांची कन्या आहे.
या सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या सत्कार प्रसंगी श्री. प्रभू गुरुजी, बाबुराव सामंत, ॲड. एन. आर. देसाई, राजू आजगावकर, संदीप ठाकूर, सुनील आजगावकर, सुनील तेंडुलकर, प्रसन्ना देसाई, प्रभू व देसाई कुटुंबीय आदी उपस्थित होते. तसेच यावेळी केपीएल स्पर्धांमध्ये कणकवली तालुक्यातून भाग घेणाऱ्या सर्व सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धकांचे कौतुक करण्यात आले.





